Headlines

”पहिली 10 मिनिटं…” Scam 2003 पाहून नेटकऱ्यांची पहिली प्रतिक्रिया

[ad_1]

Scam 2003 : The Telgi Story ही मोस्ट अवेटेड वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे सध्या तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 1 सप्टेंबर पासून ती सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. त्यामुळे या सिरिजची चांगलीच चर्चा आहे. 2020 साली Scam 1992 ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिरिजला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होती. हर्शद मेहतानंतर आता अब्दुल करीम तेलगीनं केलेल्या स्टॅम ड्युटी घोटाळ्याची कहाणी ही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे या सिरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. सध्या या सिरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद येताना दिसतो आहे. त्यातून सध्या ट्विटरवर प्रेक्षक हे नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यावेळी अनेक प्रेक्षकांनी खास कमेंट्सही केल्या आहेत. तेव्हा चला तर पाहुया प्रेक्षकांना ही वेबसिरिज किती भावली आहे? 

दिग्दर्शक हंसल मेहता यांची काही दिवसांपुर्वी Scoop ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. प्रेक्षकांनी आणि अनेक बड्या जाणकारांनी या वेबसिरिजला हंसल मेहता मास्टरपिस असं म्हटलं होतं आता पुन्हा एकदा या सिरिजला देखील प्रेक्षकांनी मास्टरपिस असंच म्हटलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या सिरिजवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे सध्या या सिरिजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

एका युझरनं लिहिलं आहे की, ”स्कॅम 2003 हा एक मास्टरपिस आहे.” तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ”मी फक्त 10 मिनिटं सुरूवातीच पाहिली आणि मला या वेबसिरिजनं झपाटून टाकले” तर तिसऱ्या एका युझरनं लिहिलं आहे की, ”व्हा असा मास्टरपिस मला पाहायाला आवडेल.” तर तिसऱ्या एका युझरनं लिहिलं आहे की, ”या सिरिजचा इन्ट्रो स्किप करून चालणार नाही”. त्यामुळे सध्या या सिरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. 

हंसल मेहता यांनी ही सिरिज एक शो रनर म्हणून प्रेझेंट केली आहे. यातून आपल्याला मराठी कलाकार अधिक पाहायला मिळतील. ही वेबसिरिज तुषार हिराचंदानी यांनी दिग्दर्शित केली आहे. यावेळी गगन देव रायर, भावना भावसार, मुकेश तिवारी, सना अमीन शेख, भरत जाधव, शान राधंवा, शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर असे कलाकार आहेत. अब्दुल करीम तेलगीनं स्टॅम पेपरचा घोटाळा केला होता. त्यातून त्याला 30 वर्षांचा तुरूंगवास घडला होता. 2017 साली त्याचे निधन झाले होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *