Headlines

सलमान खानला ‘या’ गंभीर आजारानं ग्रासलं? ‘आत्महत्येचा विचार’ म्हणताच चाहत्यांना चिंता

[ad_1]

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा लाखोंच्या मनावर राज्य करतो. सलमान सध्या चर्चेत असण्याचं कारण त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर 3’ आहे. सलमान त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत राहतो. सलमान विषयी बोलायचे झाले तर तो स्पष्टपणे त्याला जे वाटतं ते सगळ्यांसोबत शेअर करताना दिसतो. कोणाला आठवण असेल तर सलमान खान जेव्हा त्याच्या ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाचं प्रमोशन करत होता. त्यावेळी त्यानं खुलासा केला होता की त्याला खूप गंभीर आजार झाला होता. ती आजार जगात सगळ्यात जास्त त्रास देणारा असं म्हटलं जातं.  

डॉक्टरांनुसार, या आजाराचे निदान झाल्यास रुग्णाच्या धमन्या खूप दुखतात आणि रुग्ण हे आत्महत्या देखील करतात. 2017 मध्ये ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटा दरम्यान, सलमान खाननं सांगितलं होतं की त्याला ‘ट्राइजेमिनल न्यूरेल्जिया’ नावाच्या एक गंभीर न्यूरोलॉजीकल आजाराचे निदान झाले आहे. त्याला सुसायडल डिजीज देखील म्हटलं जातं. 

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान जेव्हा या आजाराचा सामना करत होता, तेव्हा त्याच्या मनात देखील अनेक वेळा आत्महत्या करण्याचा विचार आला होता. याचा खुलासा स्वत: सलमाननं एका मुलाखतीत केला होता. जेव्हा एखादी व्यक्ती 50 शीत असते तेव्हा त्यांना हा आजार खूप जास्त होतो. त्यामुळे या आजाराशी लढण्यासाठी स्वत: ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. इतकंच नाही तर वयाच्या या टप्यातही फिट राहण्यासाठी सलमान जिमला जातो. 

पुढे सलमान खानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच ‘टाइगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत कतरिना कैफ दिसणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सलमान ‘किक 2’, ‘दबंग 4’ आणि ‘बजरंगी भाईजान’ च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. 

हेही वाचा : ‘बेटे को हाथ लगाने से पहले….’ हा डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताच, मग आला कुठून?

दरम्यान, ‘टाइगर 3’ मध्ये सलमानसोबत फक्त कतरिना आणि शाहरुख नाही तर त्यांच्यासोबत इतर कलाकारही दिसणार आहे. शाहरुख प्रमाणे या चित्रपटात हृतिक रोशन, आलिया भट्ट देखील दिसणार आहेत. इतकंच नाही तर ‘वॉर 2’ या चित्रपटात दिसणारा दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर देखील या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *