Headlines

सलमान खानचे 6 Packs नकली? व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ व्हिडीओनं चाहत्यांमध्ये खळबळ

[ad_1]

Salman Khan 6 Packs Video: सोशल मीडियावर सलमान खानचे असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही रंगलेली असते. यावेळीही सलमान खानचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात सर्वांचेच लक्ष हे त्याच्या सिक्स पॅक्सकडे गेले आहे. यावेळी या व्हिडीओकडे पाहून असं वाटतंय की सलमानचं पोट फारच सुटलं आहे आणि आत्तापर्यंत आपल्या ज्या सिक्स पॅक्स एब्ससाठी तो ओळखला जातो ते काय प्लॅस्टिकचे वैगेरे आहेत की काय? यावरून त्याची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सलमान खान हा आपल्या सिक्स पॅक्स एब्ससाठी ओळखला जातो. त्यानं काही महिन्यांपुर्वी आपला असाच एक हॉट फोटोही शेअर केला होता. त्यामुळे त्याची तरूणींमध्ये जोरात चर्चा असते.

दोन दिवसांपुर्वी @newsofbollywood या ट्विटर अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यातून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की सलमान खान हा डान्स करताना दिसतो आहे आणि त्याच्या मागे काही आर्टिस्टही डान्स करताना दिसत आहेत. यावेळी सलमान खाननं ब्लॅक जीन्स, टीशर्ट आणि ब्लॅक जॅकेट घातलं होतं. परंतु त्याच्या सिक्स पॅक्सवर नेटकऱ्यांची नजर जाऊ लागली होती. तेव्हा सलमानचं पोट सुटलं आहे की काय अशी शंका नेटकऱ्यांना वाटू लागल्यानं या व्हिडीओखालीदेखील नेटकरी नानाविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यामध्ये कॅप्शन दिलं आहे की, हे तर सलमान खानचे सिक्स पॅक्स आहेत तेही पोट सुटलेले. परंतु चित्रपटात 100 टक्के हे खरे प्लॅस्टिकचे सिक्स पॅक्स आहेत.

हेही वाचा : VIDEO: जबरदस्ती किस! शाहरूख खान अडकला महिलांच्या घोळक्यात…

सलमान खान हा आपल्या फिटनेससाठी प्रचंड चर्चेत असतो. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी ‘किसी का भाई किसी जान’ या चित्रपटाच्या एका कार्यक्रमातही सलमान खाननं आपलं सिक्स पॅक्स अॅब्स दाखवले होते. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आताही त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्याच्या या व्हिडीओखालीही नेटकरी नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत.

 

सलमान खानच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यातून त्यानं अंबानींच्या घरीही उपस्थिती दर्शवली होती. आता लवकरच त्याचा ‘टायगर 3’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *