Headlines

फडणवीस की अजितदादा? उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी? सुप्रिया सुळेंचं उत्तर ऐकूण बसेल धक्का

[ad_1]

Khupte Tithe Gupte Supriya Sule : छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं हे तिसरं पर्व सुरु आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते करत आहे. तर या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. या कार्यक्रमात वेगवेगळे सेलिब्रिटी आणि राजकारणातील लोक हजेरी लावताना दिसतात. दरम्यान, आता या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी हजेली लावली आहे. त्यावेळी अवधुत गुप्तेनं त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यात सगळ्यात चांगला उपमुख्यमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस की अजित पवार ते कोणत्या पुतण्याचं काका विरोधात असलेलं बंड योग्य होतं, यासारखे अनेक प्रश्न विचारण्यात आले. 

या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत अवधूत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारतो की ‘उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी आहे? अजित पवार की देवेंद्र फडणवीस?’ तर अवधुतच्या या प्रश्नावर उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अर्थात, अजित पवार.’ त्यानंतर पुढे अवधुत गुप्ते सुप्रिया सुळेंना एक प्रश्न विचारतो की कोणत्या पुतण्याचं काका विरोधात असलेलं बंड योग्य होतं असं वाटतं? त्याच्या ऑप्शनमध्ये राज ठाकरे, धनंजय मुंडे की अजित पवार … मात्र, यावर आता सुप्रिया सुळे काय उत्तर देतील याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

या आधी देखील सुप्रिया सुळे यांचा कार्यक्रमातील एक प्रोमो व्हायरल झाला होता. त्या प्रोमोमध्ये अजित पवार यांच्यासोबतच्या काही फोटोंचा एक व्हिडीओ सुप्रिया सुळे यांना दाखवण्यात आला आहे. अजित पवारांसोबतचे ते फोटो पाहून सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले आणि त्या कॅमेऱ्यासमोर रडू लागल्या. हे पाहता लगेच अवधुत गुप्ते म्हणाले की ‘तुम्ही स्टेजवर येण्या आधी म्हणाला होतात की आम्ही आमच्या भावना कोणा समोर दाखवू शकत नाही. आता तुम्ही यावर काय म्हणाल…’

हेही वाचा : आमिरच्या लेकीच्या लग्नाची तारिख आणि ठिकाण ठरलं! ‘या’ दिवशी घेणार सप्तपदी

या कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांविषयी बोलायचे झाले तर राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हे राजकारणी होते. तर सेलिब्रिटींमध्ये श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, अमोल कोल्हे, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. तर, आगामी भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आपल्याला दिसणार आहेत. त्यावेळी त्यांच्या खासगी आयुष्यापासून राजकीय आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींवर त्या बोलताना दिसतील. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *