Headlines

दुर्देवाने फक्त आईच पूर्णपणे प्रेम देत होती; आई-वडिलांच्या लग्नाविषयी बोलताना गश्मीर महाजनी भावूक

[ad_1]

Gashmeer Mahajani : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वडिलांमुळे चर्चेत  होता. बराचवेळा सोशल मीडियापासून गश्मीर महाजनी लांब होता. तो पुन्हा कधी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अशात गश्मीर आता त्यातून बाहेर आला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत करत आहे. त्यामुळे आता गश्मीरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी गश्मीरला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. 

गश्मीरनं लेट्स मेक द मूड ए लिटिल लाईटर… आस्क गॅश- फन थिंग्स ओनली… असं म्हणत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला. यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. एक नेटकरी म्हणाला की सर तुमच्या आई- वडिलांचं अरेंज मॅरेज झालं की लव्ह मॅरेज… कारण मला जाणून घ्यायला आवडेल की मधू मॅडम सारख्या एवढ्या छान व्यक्ती रवींद्र सरांच्या आयुष्यात कशा… त्यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला, त्यांचा प्रेम विवाह होता… पण जे प्रेम होतं ते सगळं फक्त तिच्याबाजूनं होतं. ही वाईट गोष्ट आहे. 

Gashmeer Mahajani talks about his parents marriage and how the love was only from mother s side

एका चाहत्याने गश्मीरला विचारलं, ‘तुमच्या आई – वडिलांचं लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज? मधू मॅडमसारख्या सारख्या एवढ्या छान व्यक्ती रवींद्र सरांच्या आयुष्यात कशा आल्या याबद्दल जाणून घ्यायला आवडेल..’, चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘दोघांचं लव्ह मॅरेज होतं. पण दुर्दैवाने अगदी मनापासून प्रेम फक्त तिनेच केलं.’ सध्या सर्वत्र अभिनेत्याने दिलेल्या उत्तरांची चर्चा रंगत आहेत. पुढे आणखी एका चाहत्यानं गश्मीरला प्रश्न विचारला की एक खून माफ असेल तर कोणाला मारशील यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला, ‘कोणाला मारणार नाही… फक्त चांगलं काम करेन… यश हाच सर्वात चांगला सूड…’ 

Gashmeer Mahajani talks about his parents marriage and how the love was only from mother s side

हेही वाचा : VIDEO : महाकाल मंदिर परिसरात चप्पल घालून फिरणारे परिणीति चोप्रा-राघव चड्ढा ट्रोल

गश्मीर विषयी बोलायचे झाले तर तो लोकप्रिय दिवंगत अभिनेता रवीद्र महाजनी यांचा मुलगा आहे. रवींद्र महाजनी गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्या कुटुंबापासून लांब राहत होते. तर त्याशिवाय पुण्यात ते एकटे राहत असताना त्यांच्या तिथल्या राहत्या घरीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या दोन ते तीन दिवसांनंतर त्या विषयी सगळ्यांना कळलं.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *