Headlines

Duniyadari: ‘गाडी थांबवून मी 15 मिनिटं ढसढसा रडलो…’, दुनियादारीच्या दिग्दर्शकाने सांगितला ‘तो’ किस्सा; पाहा Video

[ad_1]

10 Years Of Duniyadari: कॉलेजचा कट्टा अन् दोस्तांची दुनियादारी, याची प्रचिती देणारा दुनियादारी या सिनेमाने तरुण पोरांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली. एवढंच काय तर अनेकांना कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. मराठी सिनेसृष्टीत कॉलेजचा कट्टा जिंवत ठेवण्याचं काम केलं दुनियादारी या चित्रपटाने… प्रत्येक मित्रांच्या गृपमध्ये एक दिग्या असतो अन् त्या दिग्याची एक सुरेखा… त्याचबरोबर जिवाला जीव देणारा श्रेया (दुनियादारीतला स्वनिल जोशी).. याच दुनियादारी सिनेमाला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. अशातच आता दुनियादारीच्या टीमने पुन्हा एकदा आपल्या आठवणी जाग्या केल्या आहेत. 

दुनियादाराच्या टीमने झी मराठीवरच्या चला हवा येऊ द्या, या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी दिग्दर्शन सजंय जाधव आणि इतर कलाकारांनी आठवणी जाग्या केल्या. त्याचाच व्हिडीओ अभिनेता अंकुश चौधरी याने शेअर केला आहे. 

ज्या दिवशी फिल्म रिलीज झाली होती, ती तारीख होती 19 जुलै 2013.. आम्ही सर्वजण पुण्याला जात होतो. त्यावेळी आम्हाला डिस्ट्रिब्युटचे फोन येत होते. सगळे शो हाऊसफूल आहेत. आम्ही सर्वांनी बोंबाबोंब केली, असं नानुजाई सिंघानी यांनी सांगितलं. त्यावेळी संजय जाधव यांनी देखील किस्सा सांगितला.

आणखी वाचा – R Madhavan: ‘माझ्यासाठी भावूक क्षण…’, फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या सेल्फीवर आर माधवनची इन्टाग्राम पोस्ट चर्चेत!

आम्ही रस्त्याने जात होतो, तेव्हा मी गाडी थांबवून रडायला लागलो. मी गाडी बाजूला केली आणि मी ढसढसून रडलो. त्यावेळी मी जवळजवळ 15 मिनिटं सतत रडत होतो. त्यावेळी स्वप्नील जोशी याने सांगण्यास सुरूवात केली. कळस असा होता की, आम्हाला एका थेटर मालकाचा फोन आला. मला माझ्या बायकोला देयला तिकीट नाहीये. माझं स्वत:चं थेटर आहे, तरी देखील माझ्या बायकोकडे तिकीट नाहीये. स्टेरकेसवर बसवायला देखील जागा नाही, असा किस्सा स्वप्निल जोशीने सांगितला.

पाहा Video

दरम्यान, संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी चित्रपट 19 जुलै 2013रोजी प्रदर्शित झाला. बघता बघता या सिनेमाला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेतय. दुनियादारीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच बॉक्स ऑफिसवर सुद्धा या चित्रपटाने चांगलं यश मिळवलंय. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *