Headlines

‘मला तरी सध्याची परिस्थिती…’; राजकारणावर सई ताम्हणकरचं रोखठोक मत

[ad_1]

कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री म्हणून ओळख असलेली सई ताम्हणकर ही नेहमीच तिच्या लुकमुळे चर्चेत असते. येत्या काळात ती मोठ्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. याआधी अभिनेत्री सई ताम्हणकरने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. अभिनेत्री सई ताम्हणकरने शिर्डीत साईंच्या चरणी नतमस्तक होत साई समाधीचे मनोभावे मध्यान आरती करत दर्शन घेतलं. यावेळी बोलताना सईने सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबही भाष्य केलं.

साईबाबांच्या चरणी आल्यावर कायमच शांत वाटत असतं, माझ्या चेहऱ्यावरील भाव सुद्धा हेच सांगत आहेत आणि साईंच्या मंदिरात कायम भाविकांची गर्दी असते. मी कायम साईदरबारी दर्शनाला येत असते. माझे नवीन प्रोजेक्ट देखील येणार आहेत. साईंकडे आपण जी प्रार्थना करतो ती सांगायची नसते, ते फक्त साई मध्ये आणि सई मध्ये आहे असं देखील सई ताम्हणकरने माध्यमांशी बोलताना म्हटलं. यासोबत राजकारणात नवनवीन विचारसरणीची गरज असल्याचं अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली.

“माझ्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला सांगत असतील. साईबाबांच्या चरणी आल्यानंतर कायमच शांत वाटते. मी इथू शांत मनाने जात आहे. खूप प्रोजेक्ट येऊ घातले आहेत पण आज गुरुवारचे महत्त्व आहे. मंदिराची काळजी देखील खूप घेतात. सगळ्यांना मनासारखे दर्शन कायम होत असतं,” असे सई ताम्हणकर म्हणाली.

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात दिसणार असे विचारताच सईने याबाबत प्रतिक्रिया दिली. “असं काहीही नाहीये. मी शूटसाठी दोन दिवस नव्हते. त्यामुळे मी शो मिस करतेय अशी पोस्ट टाकली. पण कानगोष्टींसारख्या गोष्टी पसरत असतात. आमच्यावर पंच पडला नाहीतर आम्हाला चुकल्यासारखे वाटते,” असेही सई ताम्हणकर म्हणाली.

“पिक्चर केल्यानंतर किती पैसे कमावेल, तो किती चालेल हे कोणीच सांगू शकत नाही. तसंच राजकारणाचं आहे. मला वाटतं की वेट अॅण्ड वॉचचा गेम आहे. त्याची आपण मजा घेऊ. मला वाटून काही होणार नाहीये. राजकारणात नवनवीन विचारसरणीची गरज आहे. आपण ज्याप्रमाणे डिजीटल क्षेत्रात घौडदोड करतोय ती कुठल्याच देशात मी पाहिलेली नाही. मला तरी ही परिस्थिती आवडतेय बघु पुढे काय होतंय,” अशी प्रतिक्रिया सईने दिली.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *