Headlines

नसीरुद्दीनची पत्नी असूनही रत्ना पाठक यांनी स्वीकारला नाही इस्लाम, सासूबाईंना कळलं आणि…

[ad_1]

Naseeruddin Shah Ratna Pathak Shah : बॉलिवूडमधील काही आघाडीच्या जोड्यांमध्ये येणारं एक नाव म्हणजे अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री रत्ना पाठक. कलाजगत आणि त्याहूनही अभिनय क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या, बऱ्याच चौकटींना आणि समजुतींना बगल देणाऱ्या या जोडीनं इतरही बऱ्याच जोडप्यंना अतिशय महत्त्वाचा संदेश दिला. अशा या अभिनेत्रीविषयी त्यांच्या सासूबाईंना माहिती मिळाली तेव्हा त्यांची काहीशी अनपेक्षित प्रतिक्रिया नसीरुद्दीन शाह यांनाही हैराण करून गेली. 

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) पासून नसीर आणि रत्ना यांच्या प्रेमाच्या नात्याची सुरुवात झाली. त्यांचं प्रेमाचं नातं फार काळ टिकलं. पण, त्यांच्या प्रेमाचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. कारण, नसीरुद्दीन विवाहित होते. पण त्यांचं हे नातं मात्र अतुट होतं. अखेर अनेक बंधनं झुगारून त्यांनी 1982 मध्ये विवाहबद्ध होत सहजीवनाचा प्रवास सुरु केला. 

हल्लीच या ज्येष्ठ अभिनेत्यानं एका प्रतिष्ठीत माध्यमसमुदासोबत एक खुलं पत्र प्रसिद्ध केलं. जिथं त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबतचे बरेच खुलासे केले. आंतधर्मिय विवाहाचा मुद्दाही त्यांनी इथं प्रकाशझोतात आला. रत्ना पाठक यांनी लग्नानंतरही आपला धर्म कसा बदलला नाही, इस्लाम कसा स्वीकारला नाही हे नसीरुद्दीन यांच्या आईसाठी काहीसं अनपेक्षित होतं. 

याचविषयी सांगताना ते म्हणतात, ‘माझी पत्नीनं म्हणजेच रत्नानं इस्लाम न स्वीकारण्याचा मुद्दा माझ्या आईनं एकदाच उपस्थित केला होता. पण, ती सहज माहिती घेत होती. साधारण चौकशीचं स्वरुप. इथं नकारात्मक उत्तर मिळताच, हो धर्म कसा बदलला जाऊ शकतो? अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या आणि नात्याला एक प्रकारची सहमतीच दिली. ज्या काळात धर्म हा अतिसंवेदनशील मुद्दा होता त्या काळात आईकडून मिळालेली ही प्रतिक्रिया रत्ना यांच्यासाठीही आश्चर्यकारक होती. 

सासुबाईंकडून सुनेची चौकशी होण्याचा क्षण रत्ना पाठक यांना चुकला नाही. पण, त्या क्षणाचं कोणतंही नकारात्मक सावट त्यांच्या आयुष्यात राहिलं नाही हेच खरं. रत्ना पाठक यांच्याशी लग्न करण्याआधी नसीर Manara Sikri यांच्याशी विवाहित होते. पण, रत्ना यांच्याशी भेट झाल्यानंतर प्रेम, त्यानंतर लिव्हइन रिलेशनशिप आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय शाह यांनी घेतला. ज्या वर्षी त्यांनी लग्न केलं, त्याच वर्षी त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. मनारा यांच्या निधनानंतर नसीर आणि त्यांची लेक हीबा शाह रत्ना- नसीरसोबतच राहू लागली. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *