Headlines

‘देशाला आतून लागलेली किड….’, अदा शर्माचा ‘तो’ चित्रपट पाहिल्यावर मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला ‘प्रत्येक भारतीयांनी…’

[ad_1]

Ajay Purkar Watch Bastar The Naxal Story : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अदा शर्माला ओळखले जाते. अदा शर्माला या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील अदा शर्माच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर आता अदा शर्मा ही एका धाडसी विषयावर आधारित चित्रपटात झळकत आहे. ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाबद्दल एका मराठी अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. 

अभिनेत्री अदा शर्माचा ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ हा चित्रपट 15 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच मराठमोळे अभिनेते अजय पुरकर यांनी ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी हा चित्रपट कसा आहे आणि तो का पाहावा, याबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. अजय पुरकर यांनी इन्स्टाग्रामवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. 

अजय पुरकर काय म्हणाले? 

अजय पुरकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी सर्व रसिक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा, असे आवाहन केले आहे. “मी काल ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ नावाचा एक झंझावात बघितला. काल सिटी प्राई़ड कोथरूड पुणे या ठिकाणी याचा प्रीमिअर होता. माझी तिथे विजय कृष्ण जे या चित्रपटातील खलनायक आहेत, त्यांच्याशी ओळख झाली. या चित्रपटात इंदिरा तिवारी हिने खूप अप्रतिम काम केलं आहे. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. अदा शर्माने नेहमीप्रमाणेच उत्तम अभिनय केला आहे. सुदीप्तो सैन, अमरनाथ झा, विपुल शाह तुमचे खूप खूप अभिनंदन.” 

“‘द केरला स्टोरी’नंतर आता हा एक धमाका आणलेला आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट बघा आणि तुमच्याबरोबर तुमच्या मुलांनादेखील दाखवा. देशाला आतून जी कीड आणि वाळवी लागलेली आहे, जी लोकं देश पोखरत आहेत, त्या सगळ्यांना या चित्रपटाने नागडं केलेलं आहे. ही सर्व लोकं शाळेत, कॉलेजमध्ये आपण जिथे काम करतो, तिथे इंडस्ट्रीमध्ये आपल्या आजूबाजूला आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. तुमच्या मुलांना सावध राहायला सांगा, नाहीतर ही लोकं आपला देश संपवतील. ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ने अशा लोकांच्या सणसणीत कानशिलात लगावलेली आहे. हा चित्रपट प्रत्येक भारतीयांनी आवर्जून बघा, जय हिंद” असे आवाहन अजय पुरकर यांनी केले आहे. 

“बस्तर: द नक्षल स्टोरी’ या चित्रपटाच्या टीमचे खूप खूप आभार. प्रत्येक भारतीयांनी बघावा….आपल्या मुलांना नक्की दाखवा ….आपल्या आसपास हे लोक वावरत असतात…त्यांच्यापासून सावध रहा….कीड आहे देशाला लागलेली…. त्याचं समूळ उच्चाटन होईलच पण ते कसं करत आहेत ह्याची गोष्ट म्हणजे ….. ‘बस्तर: द नक्षल स्टोरी”, असे कॅप्शनही अजय पुरकर यांनी या पोस्टला दिले आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *