Headlines

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार ‘गोदावरी’चे ट्रेलर लाँच

[ad_1]

मुंबई : अभिनेता जितेंद्र जोशीनं (jitendra joshi) त्याच्या दमदार अभिनय कौशल्याची कमाल नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही दाखवली आहे. कान्स या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ या चित्रपटातील ‘खळ खळ गोदा’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी हा प्रमुख भूमिका साकारत आहे. या चित्रपटानं इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय – इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपला झेंडा रोवणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ‘माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गोदावरी’चा ट्रेलर लाँच होणार आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून सर्वांनी एकत्र  पाहावा, असा हा चित्रपट आहे. आयुष्यात एखादी गोष्ट साध्य करताना अनेक गोष्टी, नाती मागे राहतात. नात्याचं मूल्य सांगणारा, नात्यांची नव्याने ओळख करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’ 31 ऑक्टोबर रोजी हा ट्रेलर लॉन्च होणार आहे.(International Award Winning Upcoming Marathi Movie Godavari s Trailer Will Launch by devendra fadnavis) 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीत चित्रपटातील गाणं प्रदर्शित झालं होतं. नदी जशी सगळं काही पोटात सामावून वर्षानुवर्षे वाहतच राहते, तसंच काहीसं आयुष्याच होताना दिसतंय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरागत चालत आलेला वारसा आणि त्यात गुंतणारे भावविश्व यांचं उत्तम वर्णन ह्या गाण्यातून होताना दिसते. मन प्रसन्न करणारे ‘खळ खळ गोदा’ हे गाणे श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करून आयुष्याच्या नागमोडी प्रवाहात वाहताना दिसून येत आहे. गाण्याचे बोल नदीला संबोधून असले तरीही मनुष्याच्या व्यक्तिगत जीवनातील घडामोडीचा उत्तम आरसा आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या 11 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *