Headlines

Deepika Padukone च्या न्युट्रिशनिस्टनं दिला मोलाचा सल्ला, फ्रीजमध्ये आजपासून ठेवू नका ‘या’ 4 भाज्या

[ad_1]

Kitchen Tips : अनेकदा आपण रोजचा खाण्यातल्या भाज्या आणि अन्न खराब होऊ नये आणि जास्त काळ टिकावे म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवतो. पण तुम्हाला माहित आहे का कि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवायला नको. कारण ते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब तर होताच शिवाय त्यांचा सेवनाने शरीराला मोठी हानी देखील होऊ शकते. आपण बाजारातून आठवडाभरासाठी भाजी घेऊन येतो आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवतो. जेणेकरून ते बराच काळ ताजे राहिल. पण अनेक भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्यानं खराब होतात. इतकंच नाही तर आपल्या शरीरात विषद्रव्ये निर्माण करतात. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसह (Deepika Padukone) अनेक सेलिब्रिटींच्या न्यूट्रिशनिस्ट म्हणून प्रसिद्ध असेलेल्या श्वेता शाह यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 4 खाद्यपदार्थ चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. पुढच्या वेळी तुमच्याकडून अशी चूक होऊ नये म्हणून चला जाणून घेऊया काय काळजी घ्यायला हवी…

‘हे’ 4 खाद्यपदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नयेत

कांदा (Onion) 

बरेच लोक कांदे फ्रीजमध्ये ठेवतात. पण बघायला गेलो तर ते अनेक दिवस बाहेर असेच सुरक्षित राहू शकतात. कांदे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील ओलावा कमी होतो. यामुळे त्याला बुरशीचे लागते आणि इतकेच काय तर बाहेर देखील कांदे हे पिशवीत किंवा बटाट्यांसोबत ठेवू नये. 

लसूण 
लसूण चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नये. ते रबरासारखे होतात. म्हणूनच ते फ्रीजच्या बाहेर कोरड्या जागी ठेवावे.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेता Prasad Oak ची पोस्ट चर्चेत, अभिनेत्यानं दिली मोठी बातमी!

शिमला मिर्ची
लोक शिमला मिरची फक्त फ्रीजमध्ये ठेवतात. हे अजिबात करू नये. यामुळे शिमला मिरचीची त्वचा मऊ होते आणि त्यातील कुरकुरीतपणा निघून जातो. एवढेच नाही तर त्याची चव देखील खराब होते. 

टोमॅटो

टोमॅटो हा नेहमीच वापरात असेलेला पदार्थ आहे. घरात फ्रीज असेल तर त्यात टोमॅटो न ठेवणारा क्वचितच कोणी असेल. पण सेलेब्स न्यूट्रिशनिस्टच्या मते टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवू नयेत. त्यातील पाण्याची कमी होऊन रसही सुकतो. फ्रीजमुळे टोमॅटोमधील पौष्टिकताही खराब होते. म्हणूनच ते रूम टेम्परेचरवरच ठेवले पाहिजे.

फ्रीजमध्येही या गोष्टीदेखील ठेवणे टाळा

वरील ४ पदार्थाशिवाय बटाटा, काकडी, मध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवने चुकीचे आहे. अनेकदा आपण कापलेली फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवतो. अशा पदार्थाचे सेवन आरोग्याला हानिकारक ठरू शकते त्यामुळे असे करणे टाळा. यासोबतच तयार भाज्या जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवू नयेत. लवकरात लवकर सेवन करणे योग्य ठरेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *