Headlines

“दीपाली सय्यद यांचं ‘ना घर का ना घाट का’ झालंय” रुपाली ठोंबरे पाटलांची खोचक टीका | Rupali thombare patil on deepali sayyad will join shinde group rmm 97

[ad_1]

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. या बंडखोरीनंतर अनेक नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. अलीकडेच गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला असून शिंदे गटात प्रवेश केला आहे. ही गळती अजून सुरूच आहे. आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद याही शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.

पण अद्याप त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश झाला नाही. भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांनी दीपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी दीपाली सय्यद यांच्यावर खोचक टीका केली आहे. दीपाली सय्यद यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

हेही वाचा- ठाकरे गटाचे नेते राजन साळवीही शिंदे गटाच्या वाटेवर? उदय सामंतांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण

दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत विचारलं असता रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, “दीपाली सय्यद यांचं ‘ना घर का ना घाट’ असं झालं आहे. दीपाली सय्यद शिंदे गटात जाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मी म्हणेन ही त्यांच्या कर्माची फळं आहेत. अलीकडे भाजपा प्रत्येकवेळी जादूटोणा, धर्म अशा गोष्टींवर फार बोलत असतो. मीही आता त्यांच्या जोडीला जाऊन म्हणेन की, ही दीपाली सय्यद यांच्या पापाची फळं आहेत.”[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *