Headlines

Cricket Calendar: 2023 साठी Team India चं शेड्यूल टाईट; ODI वर्ल्डकपसोबत खेळायच्यात अनेक सिरीज

[ad_1]

Team India 2023 Schedule:  2022 वर्ष हे वर्ष सरलं असून आपण नव्या वर्षात (New Year) पदार्पण केलं आहे. 2023 वर्ष उजाडलं असून क्रिकेट प्रेमींसाठी (Cricket Lover) हे खूप महत्त्वाचं वर्ष आहे. मुख्य गोष्ट म्हणजे, यावर्षी क्रिकेट वनडे वर्ल्डकप (One Day world cup) खेळवला जाणार आहे, आणि याचं आयोजन भारतात केलं जाणारे. त्यामुळे वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया (Team India) मेहनत करतेय. मात्र केवळ वर्ल्डकपच नव्हे तर यावर्षी टीम इंडियाला बऱ्याच मोठ्या सिरीज खेळायचा असून टीमचं शेड्यूल (Team India Schedule) टाईट आहे. 

येत्या 3 जानेवारीपासून टीम इंडियाला श्रीलंकेसोबत सिरीज खेळायची आहे. याव्यतिरीक्त या वर्षी श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यासोबत खेळायचं आहे. यामध्ये विदेशी दौऱ्यांचा देखील समावेश आहे. जाणून घेऊया 2023 चं शेड्यूल कसं आहे

भारत विरूद्ध श्रीलंका दौरा (जानेवारी)

•    पहिली टी20 – 3 जानेवारी, मुंबई
•    दूसरी टी20 – 5 जानेवारी, पुणे
•    तीसरी टी20 – 7 जानेवारी, राजकोट
•    पहिली वनडे – 10 जानेवारी, गुवाहाटी
•    दूसरी वनडे – 12 जानेवारी, कोलकाता
•    तीसरी वनडे – 15 जानेवारी, तिरुवनंतपुरम

न्यूझीलंड विरूद्ध भारत दौरा (जानेवारी-फेब्रुवारी)

•    पहिली वनडे- 18 जानेवारी, हैदराबाद
•    दूसरी वनडे- 21 जानेवारी, रायपुर
•    तीसरी वनडे – 24 जानेवारी, इंदौर
•    पहिली टी20- 27 जानेवारी, रांची
•    दूसरी टी20- 29 जानेवारी, लखनऊ
•    तीसरी टी20- 1 फेब्रुवारी, अहमदाबाद 

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत दौरा (फेब्रुवारी-मार्च)

•    पहिली टेस्ट- 9 से 13 फेब्रुवारी, नागपुर
•    दूसरी टेस्ट- 17 से 21 फेब्रुवारी, दिल्ली
•    तीसरी टेस्ट- 1 से 5 मार्च, धर्मशाला
•    चौथी टेस्ट- 9 से 13 मार्च, अहमदाबाद
•    पहिली वनडे- 17 मार्च, मुंबई
•    दूसरी वनडे- 19 मार्च, विशाखापत्तनम
•    तीसरी वनडे- 22 मार्च, चेन्नई

आयपीएल 2023 ( एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता)

भारत विरूद्ध वेस्टइंडिज दौरा (जुलै-ऑगस्ट):

  • 2 टेस्ट, 3 वनडे आणि 3 टी20 मॅच (शेड्यूल जाहीर नाही)

एशिया कप (सप्टेंबर)

  • ठिकाण आणि तारखा जाहीर केल्या नाहीत

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत दौरा (सप्टेंबर):

  • 3 वनडे (ठिकाण, तारखांची घोषणा अजून बाकी)

वनडे वर्ल्डकप (10 ऑक्टोबर- 26 नोव्हेंबर):

  • WC भारतात होणार आहे आणि 48 सामने खेळले जाणार आहेत (ठिकाण, तारखांची घोषणा बाकी)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत दौरा (नोव्हेंबर-डिसेंबर)

  • 5 टी20 सामने (ठिकाण आणि तारखांची घोषणा नंतर केली जाईल)

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका दौरा (डिसेंबर-जानेवारी 2024):

  • 2 टेस्ट, 3 वनडे आणि 3 टी20 सामने (शेड्यूल अजून जाहीर नाही)[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *