Headlines

Chris Hemsworth Alzheimer : मनमुराद आयुष्य जगणारा अभिनेता भयंकर आजाराच्या विळख्यात, काही दिवसांतच…

[ad_1]

Chris Hemsworth Alzheimer : आयुष्य हे क्षणिक आहे, त्यामुळं प्रत्येक सेकंद हा मनमुरादपणेच जगावा असं अनेकांचं म्हणणं असतं. यात गैर काहीच नाही. कारण, सध्या सर्वच गोष्टी इतक्या पटकन घडू लागल्या आहेत की कशाचीच शाश्वती उरलेली नाही. एका लोकप्रिय अभिनेत्यालाही याचा प्रत्यय आला आहे. कारण, येत्या काही दिवसांत, वर्षात आपल्याला आजारपण गाठू शकतं आणि परिस्थिती बिघडू शकते याचे संकेत या अभिनेत्याला मिळाले आहेत. 

हा अभिनेता म्हणजे क्रिस हेम्सवर्थ (Chris Hemsworth). Vanity Fair ला दिलेल्या मुलाखतीत ‘Thor’ हे पात्र साकारणाऱ्या क्रिसनं आपल्याला अनुवांशिक अल्झायमर असल्याचं सांगितलं आहे. (Hollywood Actor Chris Hemsworth at risk of developing Alzheimer know the causes and signs)

सर्वात मोठी भीती… 

काही चाचण्यांनंतर आपल्याला याविषयीची माहिती मिळाल्याचं सांगत हीच आता जीवनातली सर्वात मोठी भीती असल्याचं क्रिस म्हणाला. क्रिसच्या डीएनएमध्ये gene APOE4 चे दोन प्रकार आढळले. ज्यामध्ये एक त्याची आणि दुसरी त्याच्या वडिलांची आहे. सदर गोष्टी अल्झायमर ( Alzheimers disease) वाढण्याची शक्यता वर्तवत आहेत. आपल्या या आजारपणाविषयी मुलांशीही संवाद साधण्याची तयारी क्रिस करत असल्याचं त्याच्या बोलण्यातून कळत आहे. 

अल्झायमर म्हणजे काय? (What is Alzheimer? )

हा आजार मनोभ्रंश (dementia) अर्थात विस्मृतीचाच एक प्रकार आहे. जिथं आठवणी, विचार, वर्तणूक नकारात्मक स्वरुपात प्रभावित होतात. या आजारामुळं दैनंदिन जीवनात काही अडचणी निर्माण होतात. बऱ्याचदा त्या गंभीर स्वरुपातही पोहोचतात. वयाच्या कोणत्याही टप्प्यात या आजाराचा विळखा बसू शकतो. 

 

प्रामुख्यानं मात्र वयाची 60 वर्षे ओलांडलेल्या व्यक्तींना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो. जगभरात आतापर्यंत या आजारानं 5 कोटींहून अधिकजणांना विळख्यात घेतलं आहे. अल्झायमरची लक्षणं दिवसागणिक बदलू लागतात. मेंदूमध्ये होणाऱ्या हालचाली आणि क्रियांमुळे या लक्षणांमध्ये बदल जाणवतात. यामध्ये अनेकदा स्मृतीभ्रंश होण्याचं प्रमाण सर्वाधिक दिसून येतं. 

गोष्टी विसरणं म्हणजे नेमकं काय? 

सहसा आपण दैनंदिन आयुष्यात एखादी गोष्ट विसरतो. पण, अल्झायमरमध्ये मात्र हे प्रमाण जास्त दिसून येतं. यामध्ये खालील क्रिया वारंवार घडतात. 
– वारंवार एकच गोष्ट, वाक्य बोलणं जेणेकरून ते लक्षात राहील
– नुकतील घडलेली घटनाही विसरणं. 
– गोष्टी कुठेतरी ठेवून त्या सतत विसरणं. त्या न सापडल्यास संतापणं. 
– ओळखीच्या ठिकाणांवरही वाट चुकणं. 
– दैनंदिन वापरातील वस्तू आणि जवळच्या व्यक्तींनाही विसरणं. 
– वस्तू ओळखणं, एखाद्या व्यक्तीशी बोलताना तो कोण, कुठून आला हेसुद्धा विसरणं. 
– नव्या व्यक्ती किंवा एखाद्या सोहळ्याला अनेक व्यक्तींच्या गराड्यात न जाणं. 
– एखाद्यावर अविश्वास दाखवणं, एकटं- निराश राहणं
– प्रमाणाहून जास्त वेळ झोपणं, काहीतरी हरवलंय ही भावना सतावणं अशी काही लक्षणं अल्झायमरग्रस्तांमध्ये पाहायला मिळतात. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *