Headlines

‘B#* यांच्याकडे कामं नाहीत का?’; पोलीसात तक्रारीनंतर चित्रा वाघ यांच्यावर संतापली उर्फी जावेद

[ad_1]

Urfi Javed vs Chitra Wagh : टिव्ही अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या गेल्या काही दिवसांपासून ट्विटवॉर सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. चित्रा वाघ यांनी गेल्या आठवड्यात उर्फी जावेदविरोधात ट्विट करत तिला बेड्या ठोकण्याची मागणी केली होती. यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं होते. यानंतर आता चित्रा वाघ यांनी थेट उर्फीविरोधात पोलिसांत (Mumbai Police) धाव घेतल्यानंतर उर्फीने पुन्हा एकदा त्यांना सल्ला दिला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची रविवारी भेट घेत उर्फी जावेदबद्दल तक्रार केली आहे. ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. ‘मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बीभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी,’ असं चित्रा वाघ यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

अभिनेत्रीवर कठोर कारवाई करावी – चित्रा वाघ

“केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे,” असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

उर्फीचे प्रत्युत्तर

याआधीही उर्फी जावेदने, तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेसाठी बोलतात पण काही करत नाहीत. माझा विषय काढून फक्त जनतेचे मत वळण्याचे काम तुम्ही करत आहात, असे प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर उर्फीने ट्विट करत थेट चित्रा वाघ यांना सल्ला दिला आहे.

“माझ्या नवीन वर्षाची सुरुवात पोलिसांच्या तक्रारीने झाली आहे. या राजकारण्यांना काही कामं नाहीत का? या राजकारण्यांना, वकिलांना कळतं की नाही? आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाही ज्यामुळे ही लोकं मला जेलमध्ये पाठवू शकतील. माझे निप्पल व व्हजायना जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत तुम्ही मला तुरुंगात टाकू शकत नाही. तुम्हाला फक्त तुमच्याकडे मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. चित्रा वाघ, मी तुम्हाला आणखी चांगल्या कल्पना देते. तुम्ही सेक्स ट्रॅफिकिंग विरुद्ध काम करा, अवैध डान्स बारवर बंदी आणा, अवैध देहविक्री व्यवसायावर बंदी आणा. मुंबईतल्या या समस्यांकडेही लक्ष द्या,” असा सल्ला उर्फीने चित्रा वाघ यांना दिलाय.

यासोबत आणखी एका ट्विटमध्ये चित्रा वाघ यांना सोडून सर्वानां नववर्षाच्या शुभेच्छा असे उर्फीने म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *