Headlines

“मुख्यमंत्री तीन महिने कशात व्यग्र होते, हे…” कळवा पुलाच्या श्रेयवादावरून आव्हाडांची टोलेबाजी! | Ncp leader jitendra awhad on cm eknath shinde kalwa flyover inauguration rmm 97

[ad_1]

ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असताना या पुलाच्या श्रेयावरुन वाद सुरू झाला. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक शब्दांत टोला लगावला. “या पुलासाठीची मागणी मीच पुढे रेटली होती. ती मान्य झाली, पुलाच्या कामाची सुरुवात झाली आणि आज त्याचा शेवट झाला. कुणीतरी असं काम सुरू करतं, उद्घाटनाला दुसरं कुणीतरी असतं. त्यात काय एवढं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“मागील तीन महिन्यात मुख्यमंत्री कशात व्यग्र होते, हे लोकांना माहीत आहे. या पुलाचं काम २०१४ च्या आधीच सुरू झालं होतं. तेव्हाच याला मंजुरी मिळाली होती. याचा अर्थ त्यावेळी आमदार कोण होतं? आणि तिसऱ्या पुलाची मागणी कोणी केली होती? दुसऱ्या पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची, नागरिकांचा तीन-साडेतीन तास उशीर व्हायचा. तेव्हा तिसऱ्या पुलाची मागणी पुढे आली. त्यानंतर मीच ही मागणी पुढे रेटली, त्यामुळे या पुलाला मंजुरी मिळाली” अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे.

हेही वाचा- “…तर ते शकुनीमामाची औलाद” जितेंद्र आव्हाडांचं नरेश म्हस्केंवर टीकास्र!

“मुळात ही मागणीच माझी होती. यानंतर या पुलाला मंजुरी मिळाली आणि काम सुरू झालं. आज त्याचा शेवट झाला. कुणीतरी काम सुरू करतो आणि उद्घाटन वेगळं कुणीतरी करत असतं, त्यात एवढं मोठं काय…” असा टोलाही आव्हाडांनी लगावला आहे.

हेही वाचा- “जितेंद्र आव्हाडांनी काही वैयक्तिक खर्चातून…”, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कौन किसकी शादी में…”!

या पुलाचं उद्घाटन झालं असलं तरी येथील वाहतूक कोंडी संपणार नाही. या पुलाला कळव्यानंतर दोन विंग्स काढा, ते विंग्स पटनी येथे सोडा. तरच वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल अन्यथा वाहतूक कोंडी कायम राहील, अशी मागणी मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे केली होती. हीच मागणी मी एकनाथ शिंदे यांच्याकडेही केली आहे. त्यांनीही हे काम करण्यास सहमती दर्शवली आहे. फडणवीसांना मला त्यावेळी हे आश्वासन दिलं होतं. त्यांनी स्वाक्षरी केलेलं पत्रही माझ्याकडे आहे, असं केल्याशिवाय या पुलाला सुखाचे दिवस येणार नाहीत, असंही आव्हाड म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *