Headlines

Celebrity Love Story : ‘या’ मराठी कलाकारांची आहे फिल्मी लव्ह स्टोरी

[ad_1]

Celebrity Love Story : सेलिब्रिटीज पडद्यावर जसे असतात तितकेच फिल्मी ते खऱ्या आयुष्यात असतात का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण काही सेलिब्रिटीज हे खरंच खऱ्या आयुष्यात फिल्मी असतात. ते पडद्यावर जितके रोमॅंटिक असतात तितकेच ते खऱ्या आयुष्यात देखील असतात. आज आपण अशाच काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांची फिल्मी स्टाईल लव्ह स्टोरी…

हार्दिक आणि अक्षया (Akshaya and Hardeek)

‘तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या निमित्तानं हार्दिक आणि अक्षयाची पहिली भेट झाली. मात्र, मालिका संपल्यानंतर हार्दिकच्या आईने अक्षयला लग्नाचा मागणी घालाण्यास सांगितले. आईचा हट्टाला कंटाळून हार्दिकनं एक दिवस फोनवर म्हणाला, ‘माझ्या आईला तू सून म्हणून आवडतेस.’ असं म्हणत लग्नाची मागणी घातली. तेव्हा अक्षया त्याला म्हणाली की  ‘माझ्या घरी येऊन आई-बाबांशी बोल.’ त्यानंतर अक्षया आणि हार्दिक लग्नबंधनात अडकले.  

 सिद्धार्थ आणि मिताली (siddharth chandekar and mitali mayekar) 

अभिनेता सिद्धार्थ आणि मितालीच्या प्रेमाची सुरुवात सोशल मीडियावर झाली. त्या दोघांच्या प्रेमाची सुरुवात ही सोशल मीडियावर झाली आहे. बराच वेळ एकत्र राहिल्यानंतर सिद्धार्थनं  मितालीला जवळच्या काही मित्रांसोर प्रपोज केलं. 

अंकुश चौधरी आणि दीपा (ankush choudhary and deepa parab)

अंकुश आणि दीपा यांची पहिली भेट ही MD कॉलेजमध्ये एकांकिकांमध्ये झाली होती. त्यानंतर एक दिवस अंकुशने  त्याच्या प्रेमाची कबुली देण्याचे ठरवले. ते सुद्धा फिल्मी स्टाईलमध्ये. अंकुशनं लोवर परेल स्टेशनला दीपाली जात असताना. अंकुश धावत दीपाच्या मागे गेला आणि गुढग्यावर बसून गुलाबाचे फुल देत तिला प्रपोज केलं. 

हेही वाचा : Salman Khan आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले? हे पाहून नेटकरी आवाक्

क्षितिश आणि ऋचा (rucha apte and kshitij)

क्षितिश दाते आणि ऋचा आपटे यांचं जोडपं हे लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. त्या दोघांची भेट ही ‘बन मस्का’ मालिकेच्या सेटवर क्षितिज आणि ऋचा ची मैत्री झाली. क्षितिशनं प्रेमाची कबुली देण्यासाठी ऋचा वाढदिवस म्हणजेच 14 जुलै निवडला. क्षितिश एकटाच केक घेऊन शुभेच्छा देण्यासाठी रात्री बारा वाजता शिवाजी पार्कच्या कट्टयावर तिला भेटला आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देत बरोबर प्रेमाची कबुली सुद्धा दिली.

आदेश बांदेकर (Aadesh Bandekar)

आदेश बांदेकर यांनी पहिल्याच भेटीत सुचित्रा या आवडल्या होत्या. आदेश सुचित्रा यांना दादर स्टेशन जवळच्या हॉटेलमध्ये भेटायला बोलवायचे पण घरच्यांनी पाहिलं तर म्हणून सुचित्रा तिथे कधी गेल्याच नाही. एकदिवस संध्याकाळी त्या घरी पोहोचल्या तेव्हा पाहतात तर काय आदेश त्यांच्या घरी आईसोबत बसले होते. ते पाहिल्यानंतर सुचित्रा यांना आश्चर्य झाले होते. सुचित्रा यांना त्यांच्या आईनं चहा करायला सांगितला आणि कामानिमित्त बाहेर पडल्या. त्यांच्या मागेमागे आदेशही गेले. बस स्टॉपला पोहोचताच त्यांनी काम काम आठवलं असं सांगत सुचित्रा यांच्या घरी पोहोचले. सुचित्रा यांनी दार उघडले तर समोर संतापलेले आदेश होते. ते म्हणाले, तुला भेटायला यायचे नव्हते तर बोलावले कशाला? तुला सिद्धीविनायक, महालक्ष्मीला न्यायचे होते  तुला काय वाटले, मी रिकामा आहे?. आताच्या आता पाच मिनिटांत मला होकार किंवा नकार दे, तू नाही म्हणाली तर मी कधीच तुला भेटणार नाही, तुझ्यामागे येणार नाही. 5 मिनिटे झाली. सुचित्रा गप्पच होत्या. आदेश हे घरातून निघून जाण्यासाठी उठले तर त्याचवेळी सुचित्रा म्हणाल्या, कधी जायचे महालक्ष्मीला? अशाप्रकारे सुचित्रा यांनी आदेश यांच्या या लव्ह स्टोरीला दिला होकार. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *