Headlines

राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन आणि रामाच्या भूमिकेत रणबीर… तुम्हाला आवडली का कास्ट?

[ad_1]

Amitabh Bachchan in Ramayana : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘रामायण’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. त्याची तयारी देखील सुरु झाली आहे. या चित्रपटात आपल्याला भलमोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. रोज कोणत्या ना कोणत्या भूमिकेसाठी वेगवेगळ्या कलाकारांची नावं समोर आली आहेत. तर नुकत्याच दिलेल्या रिपोर्टनुसार, रामायणात ‘शूर्पणखा’ ची भूमिका अभिनेत्री रकुल प्रीत सिंह दिसणार आहे. आता आणखी एका मोठ्या कलाकाराचं नाव समोर आलं आहे. 

झूम एंटरटेन्मेंटच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हे या चित्रपटात राजा दशरथांची भूमिका साकारणार आहेत. आता ही पहिली वेळ नाही जेव्हा अमिताभ बच्चन यांना अशी भूमिका मिळाली आहे. या आधी संजय खान यांनी ‘द लीजेंड ऑफ राम’ हा चित्रपट बनवण्याची प्लॅनिंग केली होती. ते देखील अमिताभ बच्चन यांनी याच भूमिकेसाठी कास्ट करणार होते. मात्र, हा चित्रपट कधी तयार झाला नाही आणि अमिताभ बच्चन यांना राजा दशरथांच्या भूमिकेत पाहण्याचं सगळ्यांचं स्वप्न अर्धवटच राहिलं. 

दरम्यान, नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना राजा दशरथाच्या भूमिकेत पाहण्यासाठी लगळेच उस्तुक आहेत. तर अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी ही माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. 

या चित्रपटातील इतर स्टार कास्ट विषयी बोलायचं झालं तर मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर,भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण  शिवतरे,अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे कलाकार दिसणार आहेत. 

हेही वाचा : ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक राहुल देव साकारणार काकर खानची भूमिका

अमिताभ बच्चन बे लवकरत दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत दीपिका पदुकोण आणि कमल हासन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वर्षी मे महिन्यात हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *