Headlines

ब्रेकिंग न्यूज…! भाऊ कदम आणि सई ताम्हणकरचं अफेअर? अभिनेत्रीला कोणी विचारला हा प्रश्न!

[ad_1]

मुंबई : सध्या मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये लग्नसराई सुरु आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ-कियाराने लग्नगाठ बांधली. तर एकीकडे मात्र बरेच सेलिब्रेटी कपल एकमेकांना डेटिंगमुळे चर्चेत आहेत. नुकतीच परिणीती चोप्रा एका खासदारासोबत स्पॉ़ट झाली होती, ज्यानंतर तिच्या अफेअर्सच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार झाल्या होत्या. 

आता मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन भाऊ कदम त्याच्या एका रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आता तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, अभिनेता विवाहीत असताना कोणाला डेट करतोय, तर होय हे आम्ही नाही म्हणत आहोत तर झी मराठीच्या इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आणि यात चक्क असा खुलासा डॉ.निलेश साबळेने केला आहे.

त्यात डॉ. निलेश साबळे सई ताम्हणकरला म्हणताना दिसतोय की, ”तुमची एक खतरनाक न्यूज आमच्याकडे आहे. यानंतर निलेश सईला म्हणतो तुम्ही लाजाल ही न्यूज ऐकून, सगळ्यांना आज मी धमाका देणार आहे. यानंतर सई म्हणते अरे या र काय आहे. यानंतर निलेश म्हणतो, या अभिनेत्रीचं सुरु आहे. या अभिनेत्याबरोबर… यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळेच थक्क होतात. 

थोडा वेळ सईदेखील थक्क होते. त्यानंतर निलेश साबळे म्हणतो, मागे स्क्रिनवर बघा, यानंतर तिथे एका बाजूला सईचा फोटो आणि एका बाजूला भाऊ कदमचा फोटो दाखवण्यात येतो. याचबरोबर या फोटोंच्या खाली कॅप्शनमध्ये लिहीण्यात आलं की, या अभिनेत्रीचं या अभिनेत्यासोबत चॅट मॅट, यानंतर त्या फोटोत भाऊला पाहून तिथे उपस्थितांना पाहून धक्का बसतो.

त्यानंतर सगळेच तिथे उपस्थित असलेले हसू लागतात. त्यानंतर निलेश सईला चिडवू लागतो की, बरेच दिवस तुमच्या काहीतरी सुरु आहे, यावर सई हसू लागते. यानंतर निलेश म्हणतो, आम्हाला आमच्या सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. चला हवा येऊ द्या च्या शो पासून सुरु झाली होती लव्हस्टोरी, भाऊने दिली आहे प्रेमाची कबूली. की, लग्नानंतर सई चारही पोरांना संभाळायला तयार आहे. त्यानंतर सगळे हसू लागतात. यापुढे या व्हिडिओत सई आणि भाऊचे फोटो स्क्रिनवर दाखवण्यात येतात. मात्र यानंतर निलेश म्हणतो, या बातमीच्या मागे एक बातमी आहे आणि ती म्हणजे सईने सगळ्यांना एडव्हान्समध्ये एप्रिलफूल केलं आहे.”

हा व्हिडिओ नुकताच पार पडलेला झी चित्र गौरव सोहळ्या दरम्यानचा आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. झी मराठीच्या इस्टाग्रामवर हा कॉमेडी व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याचबरोबर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ”सईने दिली भाऊंना प्रेमाची कबुली ? चर्चा रंगणार बातमी गाजणार…” [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *