Headlines

लाडक्या भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पांची आरती, पाहा VIDEO

[ad_1]

Salman Khan Ganpati Aarti: काल सर्वांच्याच घरी गणरायाचं आगमन झालं आहे. सेलिब्रेटींच्याही घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटी गणेशाची. सलमान खानच्या घरी देखील दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे त्याचीही सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्याच्या घरी संपन्न झालेल्या आरतीची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. सलमान खान कायमच गणेशोत्सवात आग्रहानं सहभागी होतो. ढोलताशाच्या गजरात देखील तो सहभागी होतो. त्याचे असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल झाले आहेत. ज्यात तो गणपतीच्या मिरवणूकीत आनंदानं सहभागी होतो आणि डान्सही करतो. त्यामुळे त्याचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात.

यावेळी मुकेश अंबानी यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशा राजकारण्यांपासून ते बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनीही हजेरी लावली होती. रितेश देशमुखच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. सोबतच यावेळी त्यांनी तयार केलेल्या इकोफ्रेंडली गणपतीची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्याच्याही घरच्या आरतीचे फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल झाले आहेत.

त्याचसोबत काल सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे. त्याच्याही घरी बॉलिवूड सेलिब्रेटींची गर्दी पाहायला मिळाली होती. यावेळी शिल्पा शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, रकूल प्रित सिंग, सारा अली खान अशा लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे त्यांची बरीच चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली होती. 

हेही वाचा : ज्या चाळीत लहानाचे मोठे तेथे अचानक पोहोचले जॅकी श्रॉफ, मानेवर रुमाल ठेवण्याचे रहस्यही उलगडले

यावेळी सलमान खाननं आपली बहीण अर्पिताच्या घरी गणपती बाप्पाची आरती केली. यावेळी सलमान खानच्या संपुर्ण परिवारानं हजेरी लावली होती. सोबतच तिच्या घरी शमिता शेट्टी, लुलिया वान्तूर, वरूण धवल, नताशा दलाल यांनीही हजेरी लावली होती. यावेळी शाहरूख खाननंही सलमानच्या घरी हजेरी लावली होती. यावेळी सलमान खान यांची आई उपस्थित होते. सलीम खान, हेलनही उपस्खित होते. सध्या सलमान खानची जोरात चर्चा आहे कारण त्याचा ‘टायगर 3’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. यावेळी कतरिनाही त्याच्यासोबत दिसणार असून मध्यंतरी तिचा या चित्रपटातील एक डान्सही लीक झाल्याचे समोर आले होते. या चित्रपटाचा पहिला लुकही प्रसिद्ध झाला आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *