Headlines

बॉलिवूडमधली ‘ही’ सर्वांत महागडी अभिनेत्री, जाणून घ्या

[ad_1]

मुंबई :  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख (Asha parekh) यांना दादासाहेब फाळके पुरस्कार (Dada Saheb Phalke Award) जाहिर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी दादासाहेब फाळके पुरस्काराने (Dada Saheb Phalke Award) आशा पारेख यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारानंतर आशा पारेख (Asha parekh) यांच्या संदर्भात अनेक गोष्टी समोर येत आहेत. यातील एक महत्वपुर्ण गोष्ट म्हणजे आशा पारेख किती फिस घ्यायच्या,जाणून घ्या.(asha parekh honour with dadasaheb phalke award this year anurag thakur announce bollywood) 

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag thakur) या पुरस्काराची घोषणा करताना म्हणाले की, दादासाहेब फाळके समिती, ज्याचे सदस्य आशा भोसले, हेमा मालिनी, पूनम ढिल्लन, उदित नारायण आणि टीएस नागभरणा आहेत. या समितीने यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यासाठी आशा पारेख यांची निवड केली असल्याची माहिती दिली.यासह ठाकूर पुढे म्हणाले की, यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dada Saheb Phalke Award) अभिनेत्री आशा पारेख (Asha parekh) यांना मिळत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी 95 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात
आशा पारेख (Asha parekh) यांनी बालकलाकार म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचा पहिला चित्रपट रीलीज झाला होता. हा चित्रपट होता नासिर हुसैन दिग्दर्शित ‘दिल देके देखो’. पहिल्याच चित्रपटात आशा पारेख यांच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटानंतर आशा पारेख थांबल्याच नाहीत, एका पेक्षा एक हिट चित्रपट देत त्या बॉलिवूडच्या हिट गर्ल ठरल्या होत्या. 

हिट चित्रपटांची नावे 
आशा पारेख (Asha parekh) यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ज्यात जब प्यार किसी से होता है, फिर वो ही दिल लाया हूं, तीसरी मंझिल, प्यार का मौसम, कटी पतंग आणि कारवां यासारख्या संस्मरणीय चित्रपटांचा समावेश आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील हिट गर्ल
आशा पारेख (Asha parekh) यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील हिट गर्ल म्हणून ओळखले जात होते. आशा पारेख यांनी त्यांच्या दशकभराच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. आशा पारेख त्यांच्या काळातील सर्वात महागड्या कलाकारांपैकी एक होत्या. असं म्हटलं जात की, 70 च्या दशकात आशा पारेख इतकी फीस घ्यायच्या जितकी फीस चित्रपटातील एका हिरोला देखील मिळायची नाही. 

दरम्यान आशा पारेख (Asha parekh) यांना दादासाहेब फाळके पुरस्कार (Dada Saheb Phalke Award) जाहिर झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *