Headlines

बोल्ड, बिनधास्त, स्टायलिश आणि फिट! हेमांगी कवीला तुम्ही किती फॉलो करता?

[ad_1]

Hemangi Kavi Birthday : हेमांगी कवी आपल्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. तिचे सोशल मीडियावरही अनेक फॅन्स आहेत. मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक, जाहिराती अशा अनेक माध्यमांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट्स’ मधून तिनं शिक्षण घेतले आहे. ‘ती फुलराणी’ हे हेमांगीचे गाजलेले नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असायची. सध्या ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती आपले अनेक विविध रिल्स, व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी ती ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही सोशल मीडियावर पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. तेव्हा माध्यमांमध्ये फक्त आणि फक्त तिचीच चर्चा होती. विनोदी भुमिका आणि गंभीर भुमिकाही ती फार उत्तमप्रकारे करते. सोशल मीडियावरही तिचे असंख्य तरूण फॉलोवरर्स आहेत. आज हेमांगीचा वाढदिवस आहे. सध्या तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

हेमांगी कवी आणि फीटनेस 

हेमांगी कवी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. योगा, जीम ती नियमितपणे करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. हेमांगी कवी ही जेवढी स्टायलिस्ट असते तेवढीच ती फार स्टायलिशही आहे. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटोही शेअर करते. 

काय होती ‘बाई बुब्स आणि ब्रा’ पोस्ट?

2020 च्या काळात एका अभिनेत्रीच्या पोस्टनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली होती आणि ती म्हणजे हेमांगी कवी हिच्या पोस्टची. यावेळी ‘बाई बुब्स आणि ब्रा’ या तीन शब्दांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हा कुठला चित्रपट नव्हता तर एक वास्तवदर्शी पोस्ट होती. ज्याबद्दल तिनं भरभरून लिहिलं होतं. या पोस्टपुर्वी तिचा एका व्हिडीओ तिनं शेअर केला होता. त्यावेळी तिला तिच्या वेशभुषेवरून, तिच्या प्रेझेंट राहण्यावरून खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यावरून तिनं ही पोस्ट शेअर केली होती. यावरून स्त्रियांच्या शरीरावरून आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या ट्रोलर्सना तिनं सडेतोड उत्तर या पोस्टवरून दिले होते. स्त्रियांनी ब्रा घालावी की नाही यावरही या पोस्टमधून संदेश जात होता. 

‘ती फुलराणी’

‘ती फुलराणी’ हे ज्येष्ठ लेखक पु.ल.देशपांडे यांचे सर्वात लोकप्रिय नाटकं. या नाटकातून ज्येष्ठ अभिनेत्री भक्ती बर्वे, मग अभिनेत्री अमृता सुभाष आणि हेमांगी कवी अशा हरहुन्नरी अभिनेत्रींनी फुलराणीची भुमिका साकारली होती. तिच्या नाटकालाही प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

‘गेटवे ऑफ इंडिया, चहा आणि हेमांगी कवी’

हेमांगी कवी हिनं ताजमधला चहा प्यायला होता. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यावेळी तिनं एक पोस्ट शेअर केली होती ज्यात ती म्हणाली होती की, ”लहानपणापासून वाटायचं ‘साला एकदा तरी ताज हॉटेल मध्ये जाऊन चहा पिऊन यायचंय यार!
41 वर्ष मुंबईत राहून ही कधी ताज हॉटेल मध्ये जायची हिंमत नाही झाली. कारण इच्छा असली तरी आपण पडलो typical मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय माणसाला हिंमत गोळा करायला बराच काळ जावा लागतो. मी आजही मध्यम वर्गीयच आहे. घर, गाडी, घरात ac, building ला lift, 24 तास पाणी, वीज, गाठीला थोडा पैसा! ही सगळी साधनं परिस्थिती ‘आता सुधारलीये बरं’ म्हणायला पुरेशी असली तरी middle class mentality, मध्यम वर्गीय ‘मानसिकता’ गळून पाडेल याची guarantee देत नाहीत! माझं college ऐन मुंबई तलं, Sir J. J. School of fine arts! Gateway of India च्या जवळचं!”

”तिथंच मागे उभं असलेलं आणि लहानपणी कुठेतरी चित्रात black n white मध्ये पाहिलेलं हॉटेल ताज! भव्य दिव्य! बाहेरून building इतकी कमाल दिसायची पण साला आत जायची भीती! आत सोडलं नाही तर, हाकलून दिलं तर, अपमान केला तर? आणि समजा गेलोच आत तर 250/300 रुपयांचा फक्त चहा? बाप रे नको! मग ताजकडे पाठ करत, समुद्राकडे बघत, हातात अडीच रुपयांच्या cutting च्या चहावर फुंकर मारत आधीच थंड असलेल्या परिस्थितीला अजून गार करत “ह्या , हे आपलं काम नव्हे” चे घोट प्यायचो! या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी भटकंती झालीये. भारतात, भारताबाहेर, उंची उंची हॉटेल मध्ये राहायलेय. तिथलं खाल्लय, प्यायलेय. इतक्या वर्षात मोठ्या जागेची, झगमगाटाची, high standard life ची, जगण्याची नाही किमान पाहण्याची तरी सवय आता झालीये खरंतर पण ताज हॉटेल मध्ये जायचा nervousness अजूनही गेला नाही! गेल्या काही वर्षात तर बाहेरदेशात गेलं की तिथल्या खाद्यपदार्थांची किंमत indian rupees मध्ये किती हे न पाहता dollars, euros खर्च केलेत.”

 

”नवरा अनेक वेळा म्हणालाय, “अगं जाऊन तर बघू ताज मध्ये” आणि मी म्हणायचे, “नको कशाला? त्या 250 रुपयात तिथल्या पेक्ष्या भारी आणि 100 वेळा चहा बनवून देईन तुला!” Typical middle class! हा confidence 2007 साली पहिल्यांदा जेव्हा त्याने मला pizza खाऊ घातला तेव्हा नव्हता कारण चहा बनवण्यात आणि पिझ्झा बनवण्यात फरक असतो!  तर काल हट्टाने तो मला वाढदिवसानिमित्त हॉटेल ताज मध्ये घेऊन गेला! 41 वर्षात पहिल्यांदा हॉटेल ताज मध्ये शिरले! बाहेरून complete उंची लोकांचा ‘पेहराव’ पण मनात… middle class ‘इधर ही ठेहेर जाव’! … Continued in comment section!” [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *