Headlines

बिग बॉस फेम अब्दू रोझिकला EDचे समन्स; मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी होणार, काय आहे प्रकरण?

[ad_1]

Abdu Rozik Summoned By ED: तजाकिस्तानचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता अब्दू रोजिकचे जगभरात चाहते आहेत. रिअॅलिटी शो बिग बॉस 16 मध्येही सर्वात प्रसिद्ध कंटेस्टेंट होता. मात्र, आता अब्दू रोजिकच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनी लाँड्रिंग केस प्रकरणात अब्दुचे नाव समोर येतेय. अंमलबजावणी संचालनालय (ED)ने 14 फेब्रुवारी रोजी त्याला समन्स बजावले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्याची ईडीकडून चौकशी होणार आहे. 

आज ईडी कार्यालयात पोहोचणार अब्दू

समोर आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12.30 वाजता अब्दूला मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याची चौकशी करण्यात येणार आहे. मात्र, त्याच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दूला मनी लाँड्रिंग प्रकरणात साक्षीदार असल्याने ईडीने समन्स बजावले होते. त्यासंदर्भात त्याची चौकशी होणार आहे. 

काय आहे प्रकरण?

दरम्यान, अब्दू रोझिक गायक आणि अभिनेता होण्याबरोबरच एक बिझनेसमॅनदेखील आहे. अब्दूचे अनेक देशात अलिशान हॉटेल आहेत. बिग बॉस 16 मधून बाहेर पडल्यानंतर अब्दूने मुंबईमध्येही बुर्गिर नावाचे आलिशान हॉटेल सुरू केले होते. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या या हॉटेलमध्ये कोणत्यातरी दुसऱ्याच कंपनीने पैसे लावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी ड्रग्सचा व्यवहार करते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच ईडीने अब्दू रोझिकला समन्स पाठवले आहेत व त्याची चौकशी केली जात आहे. 

अब्दू रोझिक करोडो संपत्तीचा मालक आहे. मात्र, करिअरच्या सुरुवातीला त्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. लहान वयातच त्याने मोठे नाव कमावले आहे. सध्या अब्दुची नेटवर्थ करोडोंच्या घरात आहे. दुबईमध्ये त्याचे आलिशान घर आहे. त्याच्या बुटांनाही सोन्याची जर लावलेली आहे. बिग बॉसच्या घरात त्याची झलक पाहायला मिळाली होती. 

कुठून होते अब्दूची कमाई?

अब्दू गायक, अभिनय, म्युझिक व्हिडिओ, सोशल मीडियायातून तगडी कमाई करतो. इंडियन शोसोबतच त्याने परदेशातही अनेक कार्यक्रम केले आहेत. अलीकडेच त्याने एक ग्लोबल आयकॉन म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. जगभरात तो प्रसिद्ध आहे. 

बिग बॉस 16मधून मिळालं स्टारडम 

अब्दू रोझिक जगभरात लोकप्रिय आहे मात्र भारतात त्याला प्रसिद्धी मिळाली ती सलमान खानच्या बिग बॉसमध्ये. बिग बॉसमध्ये सगळ्यांना अब्दूचा खोडकर अंदाज पाहायला मिळाला. त्याच्या या खोडकर स्वभावामुळंच त्याचे फॉलोवर्स वाढले. तर सलमान खानचाही तो आवडता कंटेस्टंट बनला. अब्दू बिग बॉस 16 चा पॉप्युलर चेहरा होता. त्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. मराठमोळा शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक यांची छान जोडी जमली होती. प्रेक्षकांना त्यांची जोडीदेखील खूप आवडायची. बिग बॉस शो संपल्यानंतरही अनेक रिअॅलिटी शोमध्ये त्याला जज म्हणून बोलवण्यात आलं होतं. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *