Headlines

‘बिग बॉस 16’ च्या शिव ठाकरे , अब्दु रोजिकला ईडीचे समन्स, रेस्टॉरंट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फसले?

[ad_1]

Shiv Thakare and Abdu Rozik Ed Summoned : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ मधून सगळ्यांची मने जिंकणारा अभिनेता शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना अंमलबजावणी संचलनालय (ईडी)नं समन्स बजावलं आहे. असं म्हटलं जातं की त्याला हाय प्रोफाइल मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. हे प्रकरण कथित ड्रग्स माफिया अली असगर शिराजी संबंधीत असल्याचं म्हटलं जातं. रिपोर्ट्नुसार, या प्रकरणात साक्षीदार म्हणून दोघांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, अली असगर शिराजीची हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी होती. त्याशिवय ही कंपनी अनेक वेगवेगळ्या स्टार्ट-अप्सला फायनॅन्स करायची. यापैकी एक शिव ठाकरेचं फूड अॅन्ड स्नॅक्स रेस्टॉरंट ‘ठाकरे चाय अॅन्ड स्नॅक्स’ आहे. त्याशिवाय अब्दु रोजिकचं फास्ट फूड स्टार्टअप ‘बुर्गीर’ ब्रॅँड देखील आहे. 

कथित रित्या अलीच्या या कंपनीनं नार्को- फंडिगच्या मदतीनं पैसे कमावले. हे पैसे हसलर्स हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून इन्वेस्टमेंट म्हणून त्यांना देण्यात आली. दरम्यान, असं म्हटलं जातं की शिराजीनं कथितपणे स्टार्ट-अपमध्ये खूप इन्वेस्टमेंट केली होती. 

शिव ठाकरेनं कधी केला बिझनेस सुरु?

शिव ठाकरे हा आपल्या सगळ्यांना ‘बिग बॉस हिंदीच्या’ 16 व्या पर्वात दिसला. हा शो संपल्यानंतर तो जेव्हा बाहेर आला, तेव्हा त्यानं ‘ठाकरे टी अँड स्नॅक्स’ नावानं एक बिझनेस सुरु केला. त्यासाठी लागणारी जी गुंतवणूक होती ती हसलर हॉस्पिटॅलिटीकडून करण्यात आली होती. दरम्यान, जेव्हा अली असगर शिराजीचं ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर शिव ठाकरेनं त्यांच्यात असलेला करार रद्द केला, असं म्हटलं जातं. 
मिळाला.

रिपोर्ट्सनुसार, जवाब नोंदवताना शिव ठाकरेनं खुलासा केला की 2022-23 मध्ये त्यांची भेट एका कोणत्या मार्गानं हसलर्स हॉस्पिटॅलिटीचा संचालक क्रुणाल ओझाशी झालं होतं. क्रुणालनं त्याला ‘ठाकरे चहा आणि स्नॅक्स’साठी पार्टनरशिप डीलची ऑफर केली होती.

हेही वाचा : Oppenheimer ओटीटी रिलीज! कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहता येणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट

पुढे त्यानं सांगितलं की ‘करारानुसार, हसलर्स हॉस्पिटॅलिटीनं ‘ठाकरे चहा आणि स्नॅक्स’मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. शिव ठाकरेनं ईडीला सांगितलं की जेव्हा त्यानं त्याच्या स्टार्टअपसाठी आर्थिक मदत मागितली तेव्हा तो शिराजी यांना भेटला नव्हता किंवा त्याच्याबद्दल शिवाला काही माहितीही नव्हती.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *