Headlines

सेलमध्ये मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदी केलेला फोन असू शकतो फेक, असं ओळखा, पाहा टिप्स

[ad_1]

नवी दिल्लीः अनेक वेळा ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट्स वर सेल आयोजित केले जातात. या सेलमध्ये बंपर ऑफर्स सुद्धा दिले जातात. तसेच डिस्काउंट पाहून अनेक जण फोनला खरेदी करतात. सेलमध्ये स्मार्टफोन्सची जोरदार विक्री होते. परंतु, कधी तुम्ही विचार केला आहे का, तुम्ही खरेदी केलेला फोन बनवाट म्हणजेच नकली असू शकतो. जर तुम्ही याचा कधीच विचार केला नसेल तर या ठिकाणी काही टिप्स दिल्या आहेत. त्या जाणून घ्या.

SMS पाठवून चेक करा
डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्यूनिकेशन ने एक अशी सुविधा दिली आहे. ज्याद्वारे तुम्ही SMS पाठवून फोनची संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता. याशिवाय, तुम्ही C-DOT ॲप द्वारे सुद्धा फोन खरा आहे की बनावट हे चेक करू शकता.

मेसेज द्वारे जाणून घेण्यासाठी तुम्हाला १४४२२ या नंबरवर एक मेसेज पाठवावा लागतो. मेसेज KYM (Space) आणि तुमच्या फोनचा १५ अंकाचा IMEI नंबर या मेसेजला पाठवा. नंतर तुम्हाला तुमच्या फोनची संपूर्ण डिटेल्स मिळू शकते.

वाचाः कोणताही रिचार्ज न करता या डिव्हाइसमधून फ्रीमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, किंमत फक्त १७५५ रुपये

कसे माहिती कराला IMEI नंबर
याची पद्धत खूपच सोपी आहे. तुम्हाला फोनमध्ये *#06# डायल करावे लागेल. हे डायल केल्यानंतर तुम्हाला फोनच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल. ज्यात तुम्हाला फोनचा IMEI नंबर लिहिलेला मिळेल.

वाचाः WhatsApp मध्ये या नव्या फीचरमुळे Group Admin चे ‘पॉवर’ होणार दुप्पट, पाहा डिटेल्स

याशिवाय, एक असा ॲप आहे. ज्याद्वारे तुम्ही या ॲपला तुमच्या फोनची डिटेल्स जाणून घेवू शकता. KYM – Know Your Mobile ॲप फ्री मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या ॲपल स्टोर किंवा गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. हे ॲप C-DOT ने स्वतः आणले आहे.

वाचाः iPhone 14 वर बंपर ऑफर, ३५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *