Headlines

तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना ‘या’ विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा

[ad_1]

Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. त्या दोघांची जोडी ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तर ‘लस्ट स्टोरीज 2’ प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता.  दरम्यान, सध्या विजय वर्मा त्याच्या ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात विजय आणि सारा अली खानची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विजय वर्मानं त्याचं एका विवाहीत अभिनेत्रीवर वन सायडेड लव्ह असल्याचा खुलासा केला आहे. 

विजय वर्मानं यूट्यूबर सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. विजय म्हणाला की करिश्मा कपूरसोबत त्याची आता खूप चांगली मैत्री झाली आहे. त्याच्या आधी करीनासोबत ‘जाने जान’ मध्ये त्यानं काम केलं होतं. विजय वर्मानं सांगितलं की करीनाविषयी त्याला एक फेटल अट्रॅक्शन, एकतर्फी प्रेम आहे. त्यानं सांगितलं की त्यानं करिश्मा कपूरसोबत हॅन्गआऊट केलंय. आता त्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. 

विजय वर्मा आणि सारा अली खानच्या या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट आज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सारा आणि विजय या दोघांमध्ये रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. तर या चित्रपटात करिश्मा कपूर, पंकज त्रिपाठी, डिंपल कपाडिया, संजय कपूर आहेत. 

काल रात्री या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्या स्टायलिश अंदाजानं सगळ्यांचे लक्ष वेधले. 90 च्या दशकातील करिश्माला चित्रपटसृष्टीत कमबॅक करताना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 

हेही वाचा : आमिर खाननं चाहत्यांना दिली गुड न्यूज, लवकरच येणार ‘अंदाज अपना अपना’ चा सीक्वेल

दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयनं त्याच्या आणि सारामध्ये असलेल्या केमिस्ट्रीविषयी सांगितलं. एकीकडे आम्ही इंटिमेट सीन दिले आणि दुसऱ्याच क्षणी आम्ही मस्ती करू लागलो. आम्ही सतत एकमेकांसोबत मस्ती आणि मस्करी करायचो. त्यामुळे आमच्यात चांगली केमिस्ट्री असेल याची मी कल्पना किंवा अपेक्षा देखील केली नव्हती. तर सारा अली खान आणि विजय वर्माच्या या  चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *