Headlines

‘बाहुबली’ फेम अभिनेता होणार लवकरच बाबा?

[ad_1]

मुंबई : चित्रपटसृष्टीतून आपल्याला एकामागे एक Good News मिळत आहे. एकीकडे सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. तर दुसरीकडे सेलिब्रिटींनी त्यांच्या घरात नवीन पाहुणा येणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, दाक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता राणा डग्गुबती (Rana Daggubati) आणि त्याची पत्नी मिहिका बजाज (Miheeka Bajaj) यांच्याबाबतही अशीच काहीशी बातमी समोर आली आहे.

स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार राणा लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी मिहिका बजाज सध्या गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच, मिहिकानं करवा चौथवर एक पोस्ट शेअर केली आणि तेव्हापासून ती प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्या दोघांनी ट्रेडिश्नल कपडे परिधान केले आहेत. या फोटोला शेअर करत  ‘2 आत्मा, 2 लोक, 2 हात, 1 वचन. अनंतकाळसाठी एकत्र, आज आणि रोज आमच्या प्रेमाला सेलिब्रेट करू. तू मला पूर्ण करतोस’, असे कॅप्शन तिनं दिले आहे.  (Baahubali Fame actor rana daggubati and miheeka daggubati expecting their first child) 

दरम्यान, राणा किंवा मिहिकानं प्रेग्नेंसीच्या बातमीला दुजोरा दिला आहे. तर, हे लवकरच ही घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे. राणा आणि मिहिका यांनी 8 ऑगस्ट 2020 रोजी रामनायडू स्टुडिओमध्ये 30 लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. लॉकडाऊन दरम्यान राणाने मिहिकाला प्रपोज केला. मिहिका बजाज एक इव्हेंट प्लॅनर आहे आणि तिचा मुंबईत ‘ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ’ आहे. Baahubali Fame actor rana daggubati and miheeka daggubati expecting their first child) 

अभिनेत्याच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच त्यानं चित्रपटसृष्टीत 12 वर्षे पूर्ण केली आहेत. तो लवकरच ‘द जर्नी ऑफ इंडिया डॉक्युमेंट्री’ सीरीजच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. एवढेच नाही तर तीन निर्माते दोन चित्रपटांवर एकत्र काम करत आहेत. राणा बॉलिवूडच्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही दिसला आहे. या यादीत ‘दम मारो दम’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘बेबी’, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’, ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटांचा समावेश आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *