Headlines

बच्चन कुटुंबात पॉपर्टीवरुन वाद! अमिताभ सून ऐश्वर्यावर प्रचंड नाराज; Insta वर दिसली झलक

[ad_1]

Bachchan Family Vs Aishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा बच्चन कुटुंबाबरोबर वाद सुरु आहे की काय, अशी चर्चा सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन त्यांचा नातू अगस्त्य नंदाचा पहिला चित्रपट ‘द आर्चीज’च्या प्रीमिअरमध्ये संपूर्ण कुटुंबासहीत पाहायला मिळाले. मात्र या प्रीमियरनंतर असं काही झालं की अमिताभ बच्चन त्यांच्या सूनेवर फारच नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अगदी सोशल मीडियापर्यंत हे वाद पोहोचल्याचं बोललं जात आहे.

अमिताभ कथित कौटुंबिक वादामुळे चर्चेत

हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन आपल्या दमदार अभिनयामुळे ओळखले जातात. भारतामधील सर्वात यशस्वी आणि आजही तरुणांना लाजवेल इतक्या उत्साहाने काम करणारे अभिनेते म्हणून अमिताभ यांची ओळख जगभरात आहे. मात्र सध्या बीग बी त्यांच्या अभिनयामुळे नाही तर कथित कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहेत. मात्र आता बच्चन कुटुंबामध्ये फार मोठा वाद झाल्याचे संकेत मिळत आहेत. संपूर्ण बच्चन कुटुंब ऐश्वर्या रायवर फारच नाराज असल्याचे संकेत मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टींमधून मिळत आहेत. 

नेमका वाद कशावरुन?

अमिताभ यांनी मुलगी श्वेता नंदाला काही दिवसांपूर्वीच आपला ‘प्रतीक्षा’ हा जुहूमधील बंगला भेट म्हणून दिला. या बंगल्याची किंमत 50.63 कोटी रुपये इतकी आहे. काही चाहत्यांनी व्यक्त केलेल्या शंकेनुसार संपत्तीवरुन बच्चन कुटुंबामध्ये वाद सुरु आहे. या वादामुळेच अमिताभ बच्चन फारच नाराज असून त्यांनी अगदी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील संकेत दिले आहेत. अमिताभ यांनी आपल्या सुनेला म्हणजेच ऐश्वर्या रायला अनफॉलो केल्याची चर्चा आहे. 

नक्की पाहा हे फोटो >> अमिताभ यांनी मुलीला Gift केला 50 कोटींचा ‘प्रतिक्षा’ बंगला आतून नेमका आहे तरी कसा?

अमिताभ कोणाला फॉलो करतात?

अमिताभ हो सोशल मीडियावर फारच सक्रीय आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला 36.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. याशिवाय अमिताभ केवळ 74 जणांना फॉलो बॅक करतात. यामध्ये सलमान खान, अभिषेक बच्चन, कटरिना कैफ, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, विराट कोहली, मुलगा अभिषेक बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा, नात नव्या नवेली नंदासहीत अन्य मोजक्या लोकांचा समावेश आहे. मात्र अमिताभ आता ऐश्वर्या रायला फॉलो करत नाहीत. सध्या यासंदर्भातील स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. 

ऐश्वर्या कोणाला फॉलो करते?

मात्र अन्य एका दाव्यानुसार अमिताभ बच्चन हे इन्स्टाग्रामवर ऐश्वर्याला कधीच फॉलो करत नव्हते. इन्स्टाग्रामवर ऐश्वर्याही केवळ तिचा पती अभिषेक बच्चनलाच फॉलो करते. आता ऐश्वर्या सुद्धा आधीपासूनच अमिताभ यांना फॉलो करत नाही की आता तिने हा निर्णय घेतला आहे याबद्दल मतमतांतरे आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *