Headlines

Baba Venga : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट

[ad_1]

Baba Vanga’s Predictions For 2023 : बाबा वेंगा (Baba Venga) यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. (Baba Venga Prediction) सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. ( sun surface explosion) गेल्या चार वर्षांतील स्फोटांपेक्षा हा सर्वात मोठा स्फोट ठरला आहे. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने याची माहिती दिली आहे. सूर्यावरील ‘AR 2838’ नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झाला आहे.

बुल्गारियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. बाबा वेंगा यांनी 2023 सालासाठी अनेक भाकिते केली होती, जी खरी ठरली तर पृथ्वीवर कहर होईल. बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यापैकी अनेक आजपर्यंत खऱ्या ठरल्या आहेत.

…तर तो पृथ्वीवरुनही दिसू शकतो 

या स्फोटाला X1.5 श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. हा सनस्पॉट सूर्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला होता. येत्या काही आठवड्यांत हा सनस्पॉट जागा बदलण्याचीही शक्यता आहे. जर हा सनस्पॉट काही काळ त्याच जागी राहिला तर तो पृथ्वीवरुनही दिसू शकतो. 

याची मोठी भीती, तर यांना धोका

या स्फोटामुळे निर्माण झालेलं सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने आल्यास याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. या सौर ज्वाळामुळे ज्वालामुखी आणि रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड्स, GPSवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अंतराळयान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलू शकते

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. ज्यानंतर पृथ्वीची कक्षा बदलू शकते आणि पृथ्वीवर इतर अनेक मोठे बदल होऊ शकतात. या खगोलीय घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे बाबा वेंगा यांनी सांगितले होते.

2023 मध्ये जैविक हल्ल्याचा मोठा धोका

बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये जैविक शस्त्रांच्या हल्ल्याचा इशारा दिला होता. मात्र, हा हल्ला कोण करणार आणि कोणावर हा हल्ला करण्यात येणार आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. यासोबतच बाबा वेंगा यांनी सौर वादळांबाबत म्हणजेच सौरमालेतील वादळांचीही भविष्यवाणी केली होती.

-2023 मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीवर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

 [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *