Headlines

Astro Tips : बुधवारी करा गणपती बाप्पाची आराधना, ‘या’ उपायांनी सुटेल आर्थिक कोंडी

[ad_1]

Wednesday Tips For Good Luck : शास्त्रात सांगितले आहे की, तुमचे प्रत्येक कार्य कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावे आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा करावी. यामुळेच सनातन धर्मात कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की श्री गणेशजी हे सर्व देवतांमध्ये पहिले पूजनीय मानले जातात आणि त्यांना मंगलमूर्ती, विघ्नहर्ता इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. (Astrology) 

जो माणूस गणपतीच्या आश्रयाला येतो, त्याचे सर्व संकट देव दूर करतात. ज्या व्यक्तीला संपत्ती आणि वैभवाची इच्छा असते, त्यांनी बुधवारी गणपतीची पूजा करावी. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही भगवान गणेशाला कसे प्रसन्न करू शकता आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. (Spirituality)

– जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटानं त्रस्त असेल तर बुधवारी श्रीगणेशाला गाईचे तूप आणि गुळापासून बनवलेले अन्न अर्पण करावे. असे केल्याने अचानक पैशाचा ओघ वाढू लागतो.

हेही वाचा : Pink Lips: कोणतेही महागडे प्रोडक्टस न वापरता, फक्त घरगुती उपाय करत घालवा ओठांवरचा काळेपणा

– बुधवारी श्रीगणेशाच्या कपाळावर गायीच्या तुपात सिंदूर मिसळून टिळक लावा आणि स्वतःच्या कपाळावर टिळक लावा. या उपायाने गणेश प्रसन्न होऊन एकाच वेळी अनेक मनोकामना पूर्ण होतात आणि धन-समृद्धीही मिळू लागते.

– घरातील सदस्यांमध्ये अनेकदा मतभेद होत असतील तर बुधवारी गणपतीला 108 दूर्वा अर्पण करा. बेसनाच्या मोदकांचा प्रसाद द्या.

– बुधवारी घरातील मंदिरात पांढऱ्या रंगाच्या श्री गणेशाची स्थापना नियमांचे पालन करून पूजा करा. यामुळे गरिबी नष्ट होते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *