Headlines

आर्यन खान ते सारा अली खानपर्यंत बॉलिवूड स्टार किड्सनं अशी साजरी केली Halloween Party, पाहा Viral Video

[ad_1]

Bollywood Star Kids Halloween Party: बॉलिवूडमध्ये पार्ट्यांची कमी नाही. सतत कुठली ना कुठली तरी पार्टी ही बॉलीवूडमध्ये सुरू असते. त्यातील एक ओकेजन म्हणजे हॅलोविन पार्टी. या पार्टी बॉलिवूडमधील स्टार मंडळी आवर्जून उपस्थित असतात. सध्या अशीच एक पार्टी बॉलिवूड विश्वात रंगली होती.  सध्या या पार्टीची पहिली झलक चाहत्यांसमोर आली आहे. कारण अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी स्टार कीड्स यावेळी पार्टीच्या लोकेशनला स्पॉट झाले आहेत. सध्या बॉलिवूड स्टार किड्सवर हॅलोविन फिव्हर (Bollywood Star Kids) आहे. प्रत्येकाचे भितीदायक रूप (Horror Look For Halloween) आणि विचित्र रूप समोर येत आहे. अलीकडेच दिवाळी पार्टीत राजकुमार आणि राजकन्यांसोबत दिसलेली स्टार किड्स आता हॅलोविनच्या निमित्ताने भीतीदायक आणि पछाडलेली दिसत आहेत. (Bollywood Stars halloween party look goes viral aryan khan to sara ali khan)

काल रात्री बॉलीवूडमध्ये हॅलोविन पार्टी झाली ज्यामध्ये आर्यन खान, शनाया कपूर, अहान शेट्टी, सारा अली खान, शनाया कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. प्रत्येकाची शैली (Style) थोडी विचित्र होती त्यामुळे फोटोग्राफर्सनी कॅमेरेही त्यांच्याकडे वळवले. त्यांच्या या पार्टीच्या काही व्हिडिओंचा (Video) सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. 

या हॅलोवीन पार्टीत आर्यन खानने (Aryan Khan) आपल्या खतरनाक लुकने सगळ्यांची झोप उडवली. तो त्याच्या काळ्या रंगाचा सूट आणि त्याच्या भयानक मेकअपने चाहत्यांना घाबरवून सोडत होता. 

या पार्टीत अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Nanda) डिस्ने चित्रपटातील एका इंटरेस्टिंग लूकमध्ये दिसली. या पार्टीत एन्ट्री घेत अनन्या पांडेने (Ananaya Pandey) तिचा लूक मीडियापासून लपवला पण ती शॉर्ट स्कर्टमध्ये खूप सुंदर दिसत होती. तर तिचा बॉडीगार्ड हातात ड्रेस घेऊन मागे फिरत होता. या पार्टीत सारा अली खान (Sara Ali Khan) काळ्या आणि चांदी कलरच्या ड्रेसमध्ये दिसली.

 

तिने तिच्या मेकअप आणि हेअरस्टाइलने डेव्हिल लूक (Devil Look) पूर्ण केला. या पार्टीत सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी (Ahan Shetty) त्याची गर्लफ्रेंड (Girlfriend) तान्या श्रॉफसोबत (Tanya Shroff) दिसला. या पार्टीत जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचली होती. तिने डोळ्यांचा मेकअप आणि गडद लिपस्टिकने स्वत:ला भुतासारखे (Ghost Look) सादर केले होते. 

 

हॅलोविनचा सण दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी ख्रिश्चन धर्मीय लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवशी लोक भितीदायक कपडे घालतात. हा उत्सव आयर्लंड आणि स्कॉटलंडमधून साजरा केला जातो असे मानले जाते. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *