Headlines

रविवारी वामिकासोबत असा वेळ व्यथित करतात अनुष्का आणि विराट! तर लेक झोपल्यानंतर…

[ad_1]

Anushka Sharma-Virat Kohli time spend with Daughter Vamika : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी ही फार लोकप्रिय आहे. ते दोघं अनेकांसाठी आयडियल कपल आहेत. काही दिवसांपूर्वी अनुष्कानं अकायला जन्म दिला. सध्या अनुष्का लंडनमध्ये आहे. तर विराट नुकताच भारतात परतला आहे. या आधी दोघं अनेकदा त्यांची लेक वामिकाविषयी बोलताना दिसले. त्याविषयी एकदा बोलताना त्यांनी त्यांच्या सन्डेचा प्लॅन सांगितला आहे. त्यांचं रविवारचं रुटिन कसं असायचं हे सांगितलं आहे. 2023 मध्ये एका कार्यक्रमात त्या दोघांनी त्यांच्या फॅमिली टाइमविषयी अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या. 

या वेळी अनुष्का शर्मानं विराट कोहलीला त्याच्या रविवारच्या सगळ्यात चांगलं रूटीन काय असतं याविषयी विचारलं. ज्याचं उत्तर देत विराटनं फॅमिली टाइमचा एक किस्सा शेअर केलाय अनुष्कानं तिच्या बिझी शेड्यूलविषयी बोलताना मस्करीत म्हटलं की रविवारसाठी ऑप्शन्सची कमी नाही. खरंतर, त्यानंतर त्यांनी त्यांच्या रविवारच्या रुटिनविषयी सांगितलं की सुट्टीच्या दिवशी संपूर्ण कुटुंब त्यांच्या रुममध्ये आराम करतात. कॉफीचा कप घेऊन बसतात, कलर करतात आणि मग वामिकाला घेऊन बिल्डिंग ब्लॉक्समध्ये वेळ व्यथित करतात. विराटनं पुढे वामिकासोबत वेळ व्यथित करण्याविषयी सांगितलं की हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तिला झोप येते, ते दोघं बसून एखादा टिव्ही शो बघतात. 

त्याशिवाय अनुष्का आणि विराटनं त्यांच्या भविष्याच्या प्लॅनविषयी देखील सांगितलं. त्यासोबत विराटनं साउथ आफ्रिकाच्या जंगल सफारीविषयी देखील सांगितलं. त्यांनी सांगितलं की ही ती जागा आहे, जिथे ते दोघं त्यांच्या मुलीला घेऊन फिरण्याचा विचार करु शकतात. 

दरम्यान, जेव्हा पासून अनुष्का आणि विराटनं त्यांच्या मुलाच्या जन्माची घोषणा केली. तेव्हा पासून अनुष्का कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही. त्या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अकायचा जन्म झाल्याची बातमी दिली होती. त्यांनी त्यात सांगितलं होतं की 15 फेब्रुवारी रोजी वामिकाच्या छोट्या भावाचा म्हणजेच अकायचा जन्म झाला आहे. 

हेही वाचा : Inside Video : करण जोहरचा बेडरून इतका मोठा की एखाद्याचं अख्खं घर सामावेल; वॉडरोबमधील कपडे पाहून व्हाल हैराण

अनुष्काच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच ‘चकदा ‘एक्सप्रेस’ मध्ये दिसणार आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. तर ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जाते. तर विराट हा त्याच्या सामन्याच्या तयारीसाठी बंगळुरूला गेला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *