Headlines

रणबीर कपूरसह न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; म्हणाली ‘वडिलांनी मला…’

[ad_1]

‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून 400 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. चित्रपटाने प्रेक्षकांची योग्य नस पकडली असून, आठवड्याभरानंतरही चित्रपटगृहात गर्दी खेचत आहे. चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी अशी कलाकारांची फौजच आहे. चित्रपटातील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच चित्रपटात रणबीरसह बोल्ड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रेड कार्पेटवरील या व्हिडीओ तृप्ती डिमरी एकटक रणबीर कपूरकडे पाहत असल्याचं दिसत आहे. तिची नजर रणबीरवरुन हटतच नव्हती. 

तृत्पीने या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे. सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने आम्ही त्यावेळी फार चिंतीत होतो असा खुलासा केला आहे. “आम्ही स्क्रिनिंगमध्ये होतो आणि त्यांना संपूर्ण कास्टची मुलाखत घ्यायची होती. त्यावेळी लोक बोलत उभे होते. रणबीर माझ्यासमोरच कोणाशी तरी बोलत होता. जेव्हा कोणी तुमच्यासमोर उभं राहून बोलत असतं तेव्हा नक्कीच तुमचं लक्ष त्यांच्याकडे जातं,” असं तृप्तीने सांगितलं. 

पुढे ती म्हणाली “जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर मी सतत हात चोळत होते. माझ्या वडिलांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर मला फोन करुन तू फार घाबरली होतीस का अशी विचारणाही केली. मी त्यांना म्हटलं होतं, हो पण तुम्हाला कसं कळालं? त्यावर त्यांनी तू जेव्हा हात घासतेस तेव्हा घाबरलेली असतेस हे मला माहिती आहे म्हटलं होतं”.

5 वर्षांनी माझा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याने मी घाबरली होती. त्यात जेव्हा तुम्ही रणबीरसारख्या अभिनेत्यासह असता तेव्हा तर नक्कीच घाबरता असंही तिने सांगितलं. 

तृप्ती डिमरीने रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन शूट करण्याबाबतही खुलासा केला. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिला या सीनवर पालकांची काय प्रतिक्रिया होती असं विचारण्यात आलं असता, म्हणाली  “माझ्या आई-वडिलांना थोडासा धक्का बसला. आम्ही चित्रपटांमध्ये असे कधी पाहिले नाही आणि तू ते केलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना पचवण्यासाठी थोडा वेळ लागला. पण ते माझ्याशी गोड वागले. तू असं करायला नको होतंस, पण ते ठीक आहे. पालक या नात्याने आम्हाला असं वाटणं साहजिक आहे असं त्यांचं म्हणणं होतं’.

पुढे ती म्हणाली, “मी काहीही चुकीचं करत नसल्याचंही त्यांना सांगितलं. जोवर मी सुरक्षित आणि सहज आहे तोवर मला त्यात काही चुकीचं वाटत नाही. मी एक अभिनेत्री असून, त्या पात्राला 100 टक्के न्याय देणं माझं काम आहे”. तृप्ती डिमरी यानंतर आता ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटात दिसणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *