Headlines

करोडोंमध्ये कमाई करणारा ‘अ‍ॅनिमल’ OTT वर कुठे आणि कधी रिलीज होणार? अखेर झालं स्पष्ट

[ad_1]

रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणारा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रविवारी कमाईचे आकडे समोर आले असून, नवा रेकॉर्ड केला आहे. चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पण तरीही चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. तसंच जगभरात फक्त 3 दिवसांत 350 कोटींची कमाई केली आहे. 

चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाल्यानंतरही चित्रपटगृबाहेर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याची संधी सोडण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे. पण काहीजण हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. जेणेकरुन कुटुंब किंवा मित्रांसह अत्यंत आरामशीरपणे घऱी बसून या चित्रपटाचा आनंद घेता येईल. तर काहीजण पुन्हा एकदा चित्रपट पाहायचा असल्याने तो ओटीटीवर स्ट्रीम होण्याची वाट पाहत आहेत.

ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित?

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचं स्ट्रिमिंग ठरलेल्या एका पॅटर्नप्रमाणे केलं जाऊ शकतं. या पॅटर्नअंतर्गत हिंदी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 45 ते 60 दिवसांत कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्री केला जातो. 1 डिसेंबरला प्रदर्शित झालेला ‘अ‍ॅनिमल’ सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. याच पॅटर्नअंतर्गत ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट जानेवारीच्या पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाऊ शकतो. या चित्रपटाचे ओटीटी हक्क नेटफ्लिक्सकडे आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, मकरसंक्रातीच्या सणाला ‘अ‍ॅनिमल’ ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे. अशात 14 किंवा 15 जानेवारीला ‘अ‍ॅनिमल’ नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. मकर संक्रातीच्या निमित्ताने सुट्टी असल्याने त्याचा फायदा उचलण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असेल. 

3 तास 21 मिनिटं लांब असणाऱ्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अ प्रमाणपत्र दिलं आहे. चित्रपटात रणबीर कपूरचे रश्मिका मंधाना आणि तृप्ती डिमरी यांच्यासह इंटिमेट सीन्स असून, त्यांच्यावर कात्री चालवण्यात आली आहे. तसंच अनेक शब्दांवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे चित्रपट जेव्हा ओटीटीवर प्रदर्शित होईल तेव्हा त्या सीनसह होणार का हे पाहावं लागणार आहे. पण त्याचं उत्तर जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हाच मिळेल. पण सध्या तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *