Headlines

अनन्या पांडेच्या बहिणीनं केकचा रंग पाहून सांगितलं मुलगा होणार की मुलगी! लिंग निदान चाचणी केली? नेटकरी संतप्त

[ad_1]

Alanna Panday : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण आणि युट्यूबर अलाना पांडेनं काही दिवसांपूर्वी प्रेग्नंट असल्याचे घोषित केले. अलाना आणि फोटोग्राफर आइवर मॅक्रेनं सोशल मीडिया अकाऊंटवरून ही बातमी चाहत्यांना दिली. अलानाचा आता एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात त्यांनी घोषणा केली की त्यांना मुलगा होणार नाही. त्यांनी या व्हिडीओतून त्यांच्या होणाऱ्या बाळाचं लिंग सांगितल्यानं लोक त्यांना ट्रोल करत आहेत. 

अलानानं आइवर मॅक्रेशी गेल्या वर्षी मार्च महिन्यात लग्न केलं. लग्न केल्यानंतर अलाना ही आइवरसोबत अमेरिकेत राहते. त्या दोघांनी नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.  ज्यात अलाना आणि आइवरनं पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यासोबत त्यांच्या मागे केक असल्याचं दिसत आहे. ज्या केकवर ‘बेबी’ असं कॅप्शन दिलं आहे. जेव्हा अलाना आणि आइवरनं त्यांच्या हातात असलेल्या ग्लासनं केक कापला आणि आत असलेला हलका निळ्या रंगाचा स्पंजी केकचा भाग समोर आला. हे त्याचं लक्षण आहे की त्यांना मुलगा होणार आहे. त्यानंतर अलाना आणि आइवर हे दोघे जोरात हसू लागले आणि त्यांनी एकमेकांना किस केलं.

अलानानं या व्हिडीओतून तिच्या होणाऱ्या बाळाचं लिंग म्हणजेच मुलगा होणार की मुलगी हे सांगितलं आहे. इतकंच नाही तर काही फोटो शेअर करत तिनं कॅप्शन दिलं आहे की आमच्या मुलाला भेटण्यासाठी खूप आतुर आहेत. तर अलानानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये निळ्या आणि गुलाबी रंगाची फूलं, फुगे, उशी आणि टेडी बियर पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी अलानानं एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं होतं की मुलगा असेल की मुलगी हे जाणुन घेण्यासाठी एक पिकनिक केली? तुम्हाला काय वाटतं मुलगा असेल की मुलगी? 

दरम्यान, अलानानं तिच्या होणाऱ्या बाळाचं लिंग सांगणार अशी घोषणा केली आणि जेव्हा तिनं सांगितलं तेव्हा दोन्ही वेळी तिला ट्रोल करण्यात आलं. नेटकऱ्यांनी म्हटलं की ‘हे चुकीचं आहे. हा एक गुन्हा आहे. तुम्ही तेही सगळ्यांसमोर सांगत आहात. खरंतर गर्भ तपासण्याविषयी असं सोशल मीडियावर सांगताय, त्यांना अटक झाली पाहिजे.’ तर काही नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. 

हेही वाचा : ‘हेरा फेरी’मध्ये ‘बाबू भैया’ कडून खायला मागणारी ‘ती’ क्यूट मुलगी आता दिसते इतकी हॉट!

दरम्यान, अलानानं तिच्या प्रेग्नंसीविषयी घोषणा करत एक व्हिडीओ शेअर केला होता. जंगलात या व्हिडीओचं शूटिंग त्यांनी केलं होतं. अलानानं सोनोग्राफीची देखील झलक दाखवली होती. तर अलाया विषयी बोलायचे झाले तर ती लवकरच ‘द ट्राइब’ मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय ती करण जोहरच्या शोमध्ये दिसेल. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *