Headlines

अमिताभ बच्चन, अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटावरून चोरलाय Animal, व्हायरल VIDEO नं केला अचूक दावा?

[ad_1]

Animal Remake of Which Movie: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटाची. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. यावेळी या ट्रेलरच्या पहिल्या सीनचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. परंतु हा सीन जुन्या बॉलिवूड चित्रपटावरून घेतला असल्याचा दावा एक व्हायरल व्हिडीओमुळे झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच होताना दिसतो आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. यावेळी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या एका चित्रपटातील चित्रपटाचा हा सीन रिमेक असल्याचा दावा करण्यात आला आहे. किंबहुना यावरून सगळेच या चित्रपटाला ट्रोल करताना दिसत आहेत. 

रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, शक्ति कपूर अशी तगडी स्टारकास्ट यावेळी दिसते आहे. त्यामुळे या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. त्यातून रणबीर कपूरचा लुकही प्रचंड चर्चेत आहे. यावेळी या ट्रेलरला अल्पावधीतच प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जण या ट्रेलरमधील सुरूवातीच्या सीनची तुलना एका प्रसिद्ध बॉलिवूडमध्ये चित्रपटातल्या सीनशी करताना दिसत असून त्या चित्रपटातील अनेक सीन हे अॅनिमलच्या ट्रेलरमध्ये असल्याचा दावा होताना दिसतो आहे. त्यामुळे याची चर्चा आहे. यावेळी या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनीही प्रचंड कमेंट्स केल्या आहेत. आम्ही बोलतोय तो चित्रपट आहे ‘एक रिश्ता : अ बॉन्ड ऑफ लव्ह’ आणि ‘वक्त: द रेस अगेन्स्ट टाईम’. सध्या या चित्रपटातील सीन्स आणि एनिमलच्या ट्रेलर मधील सीन्सची सोशल मीडियावर तुलना होताना दिसते आहे. 

हेही वाचा : सिद्धार्थ म्हणाला, ‘आई, तूझ्या लग्नाचं स्वप्न…’; दुसऱ्या लग्नाबद्दल सीमा चांदेकरांनी केला पहिल्यांदा खुलासा

यावेळी रणबीरचा पहिला लुक पाहून अनेकांनी त्याची तुलना ही संजय दत्तच्या लुकशी केली आहे. या चित्रपटात प्रचंड हिंसा आहे असंही अनेकांचे म्हणणे आहे. तर अनेकांनी अशावेळी या चित्रपटाची बरीच खिल्लीही उडवली आहे. यावेळी एकानं कमेंट केली आहे की, ’20 टक्के गोष्ट, 20 टक्के अॅक्शन, 10 टक्के संजय दत्त आणि 50 टक्के पापा, पापा, पापा’ दुसऱ्या एकानं कमेंट केली आहे की, ‘हा एनिमल एक्की मुव्हीज पासून प्रेरित आहे.’

अवघ्या काही दिवसांमध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्या चाहत्यांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *