Headlines

Alia Bhatt Second Pregnancy: लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच आलिया पुन्हा एकदा गरोदर?

[ad_1]

Alia Bhatt Again Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे एप्रिल 2022 रोजी लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या 2 महिन्यानंतर आलियानं ती प्रेग्नंट (Alia Bhatt Pregnancy) असल्याची बातमी दिली आणि नोव्हेंबर 2022 रोजी तिनं त्यांची मुलगी राहाला (Raha) जन्म दिला. राहाचा चेहरा पाहण्यासाठी आलिया आणि रणबीरचे चाहते उत्सुक आहेत. तर दुसरीकडे आलिया आणि रणबीरनं 2 वर्षांनंतर राहाचा चेहरा दाखवणार असल्याचे म्हटले आहे. आलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, आलियानं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (Alia Bhatt 2 Pregnancy) 

आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आलियानं दोन फूलं हातात धरली असून तिच्या चेहऱ्यासमोर दिसत आहेत. ही दोन फूलं काही तरी महत्त्वाचे दर्शवत आहेत. इतकंच काय तर आलियानं फोटोला कॅप्शन देत 2.0 Stay Tuned असे कॅप्शन दिले आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आलिया पुन्हा एकदा प्रेग्नंट असून राहासाठी लहान भाऊ किंवा बहीण येणार आहे.

आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत आलिया पुन्हा एकदा प्रेग्नंट 2.0 का? असा प्रश्न विचारला आहे. तर दुसरा नेटकरी म्हणाला, आणखी एक बाळ? तिसरा नेटकरी म्हणाला, प्रेग्नंसी 2.0. दरम्यान, नेटकऱ्यांनी अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी आलियाला तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसी विषयी प्रश्न विचारला आहे. 

राहाला पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागेल इतक्या वर्षांची प्रतिक्षा

‘आम्हाला माहिती आहे की, हे तुमचं रोजचं काम आहे. आम्हालाही तुमची तितकीच गरज आहे, जितकी तुम्हाला आमची गरज असते. पण काहीही करा ‘राहा’चा चेहरा समोर येता कामा नये. त्या जागी वडा पाव आणि भजी लावा. आमची विनंती आहे चुकूननही राहाचा चेहरा दिसता कामा नये. फ्रेममध्ये असल्यास तिला कृपया दाखवू नका. आई-वडील म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे,’ असं आलियाने पापाराझींना सांगितलं.

हेही वाचा : Athiya K L Rahul Wedding : दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे! अथिया शेट्टीसाठी नववधूप्रमाणं सजलं केएल राहुलचं घर; पाहा VIDEO

‘आम्हाला राहाचा चेहरा दाखवयचा नाही असं काही नाही. पण सध्या ती लहान आहे. अशात किमान दो वर्षे तरी तिला या जगापासून दूर राहू द्या. दोन वर्षानंतर आम्हीच तिला तुमच्यासमोर आणू. आई वडील म्हणून सध्या आम्हाला तिची काळजी आहे’, असं देखील आलिया आणि रणबीरनं सांगितलं. दुसरीकडे या मीटिंगमध्ये सर्व पापाराझींना राहा कपूरचा फोटो दाखवला. पण त्यानंतर फोटो काढण्यास सक्त मनाई केली[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *