Headlines

Aishwarya Rai Boyfriends List : ‘या’ प्रसिद्ध कलाकारांच्या प्रेमात होती ऐश्वर्या राय

[ad_1]

Aishwarya Rai Bachchan Boyfriends List: अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आज सुखी वैवाहिक जीवन जगत आहे पण अभिषेक बच्चनसोबत सात फेरे घेण्याआधीही विश्व सुंदरीचे अनेक बॉयफ्रेंड होते. तुम्हाला सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांची नावं तर माहितीच असतील, पण याशिवाय आणखी काही नावं आहेत, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

ऐश्वर्या राय बच्चन ही बच्चन कुटुंबाची सून आहे, जी इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रसिद्ध चित्रपट आणि कुटुंबांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी लोकांना खूप आवडते आणि लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही या दोघांबद्दल एकही चुकीची बातमी आलेली नाही.

2007 मध्ये ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत सात फेरे घेतले आणि आज दोघांना एक लाडकी मुलगी आहे, जिचं नाव आराध्या आहे.

तुम्हाला माहित असेलच की, ऐश्वर्याने अभिनेता विवेक ओबेरॉयला डेट केलं आहे. ‘क्यों हो गया ना’ चित्रपटाच्या सेटवर विवेक आणि ऐश एकमेकांच्या जवळ आले होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

हे नाव जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ऐश्वर्या तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये राजीव मूलचंदानी नावाच्या मॉडेलला डेट करायची, ज्याच्यासोबत ऐश्वर्याने अनेक फोटोशूटही केले आहेत. ऐश्वर्या आणि मनीषा कोईराला यांच्यात राजीववरून जोरदार भांडण झाल्याचीही चर्चा होती.

ऐश्वर्या रायचा सर्वात लोकप्रिय एक्स बॉयफ्रेंड सलमान खान आहे. सलमान आणि ऐशची कहाणी ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर सुरू झाली मात्र त्यांच्या नात्याला ऐशच्या आई-वडिलांनी मान्यता दिली नाही, तरीही ऐश्वर्याने हे नातं सुरू ठेवलं होतं. असं म्हटलं जातं की, सलमान अॅशसोबत भांडण करत असल्याने दोघांचे मार्ग वेगळे झाले.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *