Headlines

ऐश्वर्या-अभिषेकचा खरंच घटस्फोट? चर्चेदरम्यान अमिताब बच्चन यांची पुन्हा विचित्र पोस्ट, म्हणतात ‘Do The Done…’

[ad_1]

Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि दिग्गज कुटुंब बच्चन कुटुंबात काहीही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोट होणार आहे अशी अफवा पसरली आहे. खरं तर बच्चन कुटुंबातील कोणीही या बातम्यांना दुजोरा दिला नाही. पण त्या कुटुंबातील सदस्यांच्या कृत्यावरून या अफवांमध्ये काही तथ्य आहे असं चाहत्यांना वाटतं. 

काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यामध्ये अभिषेकच्या बोटात लग्नाची अंगठी नसल्याचं दिसून आलं. कायम बोटात लग्नाची अंगठी घालणारा अभिषेकचं हे कृत्य चाहत्यांना खट्टकलं. त्यानंतर ऐश्वर्याचा कृत्याने चाहत्यांचा भुवया उंचावल्या. (Aishwarya Abhishek divorce Amitabh Bachchan Strange Post Again During Debate Says Do The Done)

द आर्चिजच्या प्रीमियरसाठी संपूर्ण बच्चन कुटुंब रेड कार्पेटवर उतरलं होतं. यावेळी सगळ्यांच्या नजरा ऐश्वर्या आणि अभिषेकवर होत्या. अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये दिसणारं बॉण्डिंग यावेळी दिसलं नाही असं चाहत्यांना वाटलं. सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. या सोहळ्यात मुलगी आराध्या अभिषेक आणि ऐश्वर्या रायमध्ये दुव्याचं काम करत होती. विशेष म्हणजे नुकताच ऐश्वर्या रायचा वाढदिवस झाला. त्यावेळी बच्चन कुटुंब तिच्यासोबत दिसलं नाही. 

नातू अगस्त्य नंदाच्या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी आजोबा अमिताभ खूप आनंदी दिसत होती. या प्रीमियरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी सासू जया बच्चन आणि नंनद श्वेता नंदा ऐश्वर्याकडे दुर्लक्ष करत होते असं जाणवतं होतं. 

त्यानंतर अजून अमिताभ बच्चन यांच्या फॉलोलिस्टमधूनही ऐश्वर्या राय गायब झाली आणि या कुटुंबात मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं. एकापाठोपाठ एक बातम्या हेच जाणून करुन देत होतं की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये कसातरी वाद झालाय. बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद झाल्याचही बोलं जातं आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी जुहूमधील प्रतीक्षा बंगला मुलगी श्वेता बच्चन नंदा हिला गिफ्ट केला. त्यात आता अजून एका कृत्याची भर पडली आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. 

अमिताभ बच्चन यांनी या सर्व अफवांच्या चर्चेत x (ट्विट ) वर पोस्ट शेयर केली आणि चाहत्यांना प्रश्न पडला आहे. ही पोस्ट नक्की कोणासाठी आणि का? ट्विटर अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो शेअर करत त्यांनी या पोस्टच्या कॅप्शमध्ये लिहिलं आहे की, ‘T 4854 – सर्व काही सांगितलं, सर्वकाही केलं.. तसं केलं आणि ते केलं..’ या विचित्र पोस्टनंतर अफवांना बळ मिळालं आहे. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *