Headlines

वय वर्षे 16, 10 मिलियन फॉलोअर्स; आमिर खानने सोशल मीडियावर ‘अशी’ शोधली सिनेमाची हिरोईन

[ad_1]

Nitanshi Goyal: सोशल मीडियात सक्रिय असणाऱ्या तरुणांना नितांशी गोयल हे नाव काही नवीन नाही. 18 व्या वर्षात येण्याआधी तिचे सोशल मीडियात 10 मिलियन म्हणजे 1 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. आणि आता तर तिला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ती आमिरचा आगामी सिनेमा ‘लापता लेडीज’मध्ये हिरोईन म्हणून झळकणार आहे. या सिनेमात ती विवाह करुन सासरी जाताना हरवलेली नवरी दाखवण्यात आली आहे. 

उत्तर प्रदेशच्या नॉएडामध्ये राहणारी नितांशी गोयल आमिर खानसोबत आपल्या सिनेसृष्टीतील करिअरची सुरुवात करत आहे. किरण राव दिग्दर्शित हा सिनेमा 2 वधुंवर आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर मोठा पडदा असल्याने त्या ट्रेनमध्ये बदली होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात. यातील एका वधुचा रोल नितांशी गोयलने केलाय. 

12 जून 2007 ला जन्मलेल्या नितांशी तिच्या आगामी सिनेमाबद्दल खूप उत्सूक आहे. लापता लेडीज सिनेमाच्या शूटींग दरम्यान खूप शिकायला मिळाले. माझ्या करिअरसाठी ही खूप मोठी संधी आहे. मी खूप असल्याचे ती सांगते. नितांशी गोयलने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात 2016 मध्ये आलेल्या ‘मन मै हे विश्वास’ मालिकेतून केली होती. यामध्ये तिने शबरीची भूमिका केली होती. 

मालिकांमध्ये काम

नितांशीने आतापर्यंत नागार्जून एक योद्धा, थपकी प्यार की, पेशवा बाजीराव, कर्मफल दाता शनी अशा चर्चेत असलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त ती इनसाइट एज-2 या वेबसिरिजमध्येही दिसली. 2015 मध्ये नितांशीने मिल ‘पैंटालून ज्युनिअर फॅशन आयकॉन 2015’ किताब जिंकला. तर 2016 मध्ये ती इंडिया किड्स फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. तिला नृत्याचीदेखील आवड आहे. तिने अनेक डान्स स्पर्धांमध्ये भागदेखील घेतला आहे. 

आईपासून प्रेरणा

आई राशी गोयलपासून आपण प्रेरणा घेतल्याचे नितांशी अभिमानाने सांगते. माझ्या आईने मला प्रत्येक पावलावर मदत केली आहे. अभिनय करता करता मी शिक्षण केलं. कारण शिक्षण खूप महत्वाचे असल्याचे आई सांगते. अभिनयात क्षेत्रात येण्याचा निर्णय माझा होता. या निर्णयात माझी मम्मी नेहमी सोबत राहिल्याचे नितांशी सांगते. तिचे 10 मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. 

माझ्यासाठी मोठी गोष्ट

मी नेहमी माझ्या चाहत्यांच्या संपर्कात असते.  आज माझे 10 मिलियन फॉलोअर्स आहेत. माझ्यासारखी साधारण मुलीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मी माझे चाहते, शुभचिंतकांचे यासाठी आभार मानते. मला लापता लेडीज सिनेमाची कहाणी सांगण्यात आली तेव्हा मी खूपच उत्साहित होते, असेही तिने सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *