Headlines

घटस्फोटानंतर अर्जुन कपूरबरोबर रिलेशनमध्ये? कुशा कपिलाने स्पष्टच बोलली, ‘मला खूप…’

[ad_1]

Kusha Kapila : गेल्या अनेक दिवसांपासून कंटेन्ट क्रिएटर आणि अभिनेत्री कुशा कपिला ही लवकरच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या सुखी या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे भूमि पेडनेकरच्या थॅंक यू फॉर कमिंग या चित्रपटात देखील कुशा दिसणार आहे. या सगळ्यात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटावर बोलताना कुशा म्हणाली की ती त्या प्रसंगातून गेली आहे. त्याशिवाय अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपवर अफवांवर वक्तव्य केलं आहे. 

कुशानं ही मुलाखत झूम एन्टरटेनमेंटला दिली होती. घटस्फोटाच्या काही महिन्यांनंतर कुशाचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडण्यात आलं होतं. जेव्हा कुशाला याविषयी विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली की, ‘मला या विषयी काही बोलायचं नाही आहे. याविषयी मी काही करायला हवं याची काही गरज मला वाटतं नाही.’

याआधी काय म्हणाली होती कुशा, रोज माझ्याविषयी अशाच काही अफवा ऐकत असते की मला वाटतं की ‘मला माझी ओळख करून देणं गरजेच आहे, याविषयी बोलावं लागतं. प्रत्येकवेळी जेव्हा मी असं काही वाचते तेव्हा मला फक्त एकच वाटतं की हे सगळं माझ्या आईनं वाचायला नको. कारण याचा परिणाम तिच्या सोशल मीडिया लाइफवर होईल.’

घटस्फोटाविषयी बोलताना कुशा म्हणाली की ‘माझ्या आयुष्यात फक्त एकचं गोष्ट आहे, वेळ जाते त्याप्रमाणे मला माझ्या आयुष्यात स्वत: ला मजबूत बनवायचं आहे. मला रोज लढाई लढावी लागणार, मला लोकांचा सामना करण्यासाठी मजबूत व्हावं लागेल. या सगळ्या जखमा लवकर भरून निघतील. मला वाटतं की माझं लक्ष एका ठिकाणी केंद्रित व्हायला नको यासाठी अनेक गोष्टी आहेत. तर मी निश्चितपणे स्वत: चं लक्ष केंद्रित करत आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वत: ला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रोसेसविषयी मला बोलायचं नाही आहे. हेच माझ्या आणि माझ्याशी जोडलेल्या लोकांसाठी योग्य आहे.’ 

हेही वाचा : ‘कंगनाच्या कानशिलात लगावेन…’, पाकिस्तानी अभिनेत्रीनं व्यक्त केली अशी इच्छा?

या मुलाखतीत ट्रोलिंगवर बोलताना म्हणाली की ‘मला माहित आहे की ट्रोलिंगसारख्या गोष्टी या तुम्ही सेलिब्रिटी आहेत त्यासोबतच येते. जर तुम्ही पब्लिक फिगर आहात, तर तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की लोक काहीना काही बोलतील, त्यांच्याकडे तेच काम आहे. ही सतत सुरुच राहतं.’[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *