Headlines

अफेअरच्या चर्चांवर Ravi Kishan यांनी थेट पत्नीचं नाव घेत म्हटलं, ‘मी माझ्या…’

[ad_1]

Ravi Kishan talk on affair with Nagma : चित्रटसृष्टी म्हटलं की कलाकारांमध्ये लव्ह अफेयर असणं हे काही नवीन गोष्ट नाही, पण या सगळ्या सर्वात जास्त चर्चा होतात त्या म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या. अनेक कलाकारांचा घटस्फोटाचे कारणच हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठरतात,अशाच एका अफेयरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये चांगल्याच रंगल्या होत्या, आणि ते म्हणजे भोजपुरी सुपरस्टार रवी किशन (Ravi Kishan) आणि बॉलिवूड अभिनेत्री नगमा (Nagma) यांच्या. मात्र, इतक्या वर्षानंतर नुकताच रवी किसान यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रवी किशन यांना ‘आप की अदालत’ या शोमध्ये या अफेयर बद्दल विचारण्यात आले होते.

रवी किशन हा भोजपुरी इंडस्त्रीमधील मोठे सुपरस्टार आहेत. त्यांनी नगमासोबत अनेक चित्रपट केलं आहेत.याच कारणामुळे या दोघांचा अफेयरच्या चर्चांना सुरुवात झाली. रवी म्हणाले, ‘आम्ही चित्रपट करायचो कारण आमचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरायचे आणि आम्ही चांगले मित्र होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी विवाहित आहे, हे सर्वांना माहीत होते. मी माझ्या पत्नी प्रीती शुक्लाचा आदर करतो आणि विशेष म्हणजे तिला घाबरतो. माझी पत्नी माझा करिअरच्या सुरुवातीपासून माझ्यासोबत आहे आणि जेव्हा माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते तेव्हापासून तिने मला साथ दिली आहे.’ (Ravi Kishan affair with Nagma)

सुपरस्टार झाल्यानं गर्विष्ट झालो

रवी किशन यांनी आपण सुपरस्टार झाल्यानंतर गर्विष्ठ झाल्याचे कबूल केले. तर बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा त्यांनी पत्नीसोबत केलेल्या चर्चेनंतर घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या पत्नीनेच त्यांना हा एक चांगला अनुभव असू शकेल असे सांगितले. रवी किशन म्हणाले,’ कारण माझे चित्रपट हिट झाल्यानंतर मी काहीसा अहंकारी झालो होतो. हे पाहून माझ्या पत्नीने मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला मला यात फारसा इंटरेस्ट नव्हता, पण मी गेलो. तीन महिने त्या घरात बंदिस्त राहिल्यानंतर मी बाहेर आलो. तेव्हा माझ्यात एक माणूस म्हणून खूप मोठा बदल झाला होता. मला लोकप्रियता तर मिळालीच होती पण माझ्यातला एक सामान्य माणूस ही जिवंत झाला होता. त्या काळात मी माझे कौटुंबिक जीवन, माझी पत्नी आणि मुलांशी असलेल्या काही वाद किंवा मतभेद संपवले. 

हेही वाचा : Celebrity Love Story : ‘या’ मराठी कलाकारांची आहे फिल्मी लव्ह स्टोरी

दरम्यान, नगमा 2009 मध्ये द टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती की आम्ही खूप चांगले मित्र आहोत. कोणत्या कलाकारासोबत सतत काम केल्यावर अशा चर्चा का सुरु होतात मला कळत नाही. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *