Headlines

प्रियांका चोप्रानंतर आता विवेक ओबेरॉयने उघड केलं बॉलिवूडचं काळं सत्य, केले धक्कादायक खुलासे

[ad_1]

मुंबई : एकीकडे प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी खुलासा केला की, तिला बॉलिवूडमध्ये साईडला केलं जात आहे आणि तिला चित्रपटांमध्ये कास्ट करण्यात येत नाही. त्यामुळेच ती बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेली. यानंतर आता अजून एक अभिनेता प्रियांकाच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. 

विवेक ऑबेरॉयने नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदमध्ये सिनेसृष्टीमागचं कटू सत्य सांगितलं आहे. त्याच्या वक्तव्याने सगळीकडेच खळबळ उडाली आहे. मी खूप खुश आहे की मी सगळ्या गोष्टींवर मात केली मात्र प्रत्येकजण इतका भाग्यवान नाहीये. असं म्हणत त्याने खळबळजनक वक्तव्य केलं. 

विवेकने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानविरोधातील पत्रकार परिषदेनंतर विवेकला कोणत्या छळाचा सामना करावा लागला याचा खुलासा त्याने नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदतेत केला आहे.  ऐश्वर्या रायसबोत सलमान खानसोबत ब्रेकअप झालं होतं तेव्हा तिच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय आला होता. यानंतर सलमान खानने त्याला धमकी दिली. या प्रकरणाबाबत विवेकने २००३ साली पत्रकार परिषदही घेतली होती

नुकत्याच हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना विवेकने त्या दिवसांची आठवण करुन देत  सांगितलं की, ”मी अनावश्यक गोष्टींमधून गेलो. अनेक लोकांचे लॉबिंग आणि राजकारण, ज्याबद्दल प्रियांकानेही सांगितलं.  हीच आपल्या इंडस्ट्रीची ओळख आहे, हे  खरंतर दुर्दैव आहे. ही बॉलीवूडची गडद बाजू आहे, जी मी देखील जवळून पाहिली आहे.”

‘मला माहित आहे की हे खूप निराशाजनक आहे, यामुळे खूप निराशा आणि त्याचा त्रास होतो. या सगळ्यामुळे तुम्हाला खूप कंटाळा येतो. एकीकडे मी शूटआऊट लोखंडवालाच्या यशाबद्दल पुरस्कार घेतला आहे आणि पुढचे 14 महिने मी घरी बसून आहे, काहीही काम नाही. यातून गेल्यावर मी विचार करत राहिलो, मला काहीतरी वेगळं करायचं आहे जे मला पुढे घेऊन जाईल, सामर्थ्यवान बनेल. विवेक ओबेरॉयने आपले लक्ष समाजसेवा आणि बिझनेसवर केंद्रित केलं. प्रियांकाचे ताजे विधान खूप प्रेरणादायी आहे. तिने बाहेर जाऊन काहीतरी वेगळं शोधून काढलं जे तिच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट ठरलं. जादू पाहा ना तिच्याबरोबर प्रोफेशनल आणि पर्सनली घडली. याचबरोबर त्याने प्रियंका चोप्राचं कौतुकही केलं.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *