Headlines

‘कदातिच उद्याच…’, मिथुन चक्रवर्ती यांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर सांगितली सत्यस्थिती

[ad_1]

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. 10 फेब्रुवारीला एका खासगी रुग्णालयात मिथुन चक्रवर्ती यांना दाखल कऱण्यात आलं होतं. 73 वर्षीय मिथुन चक्रवर्ती यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अत्यंत ठीक असून, ते लवकरच आपल्या आगामी चित्रपटांच्या शुटिंगला सुरुवात करतील अशी माहिती दिली होती. 

रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांची एमआरआयसह अनेक वैद्यकीय चाचण्या झाल्या. आदल्या दिवशी वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला होता. यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी रुग्णालयातून बाहेर पडताना प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, “खरंतर काहीच समस्या नाही. मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. पाहूयात पुढे काय होतं. मी लवकरच पुन्हा काम करण्यास सुरुवात करेन, कदाचित उद्यापासूनच”. 

दरम्यान यावेळी त्यांनी आपण आरोग्याची नीट काळजी घेत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ओरडा पडल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी मला रविवारी फोन केला होता. यावेळी त्यांनी मला आरोग्याची नीट काळजी घेत नसल्याने खडसावलं”. याआधी भाजपा खासदार दिलीप घोष यांनी सकाळी त्यांची भेट घेतली होती. 

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित असणारे मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदी, बंगाली, भोजपूर, तामिळ अशा अनेक भाषांसह एकूण 350 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *