Headlines

इतकी वर्षे वेगळं राहिल्यानंतर Ex Husband सोबत दिसली Karishma Kapoor; डिनर डेटवरून बाहेर आली आणि….

[ad_1]

Karishma Kapoor Troll : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी देखील ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. करिश्मा तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच करिश्माचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत करिश्मा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरसोबत डिनर डेटवर गेल्याचे समोर आले आहे. त्या दोघांना डिनर डेटसाठी एकत्र डिनर डेटवर जात असल्याचे पाहून काही नेटकऱ्यांनी करिश्माला ट्रोल केलं आहे. 

करिश्मा आणि संजय कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत करिश्मानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर संजय कपूरनं पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आणि ब्लेझर परिधान केलं होतं. त्या दोघांना एकत्र एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना पाहून ते डिनर डेटवर गेल्याचे म्हटले जात आहे. 

करिश्मा आणि संजय कपूर यांच्या नात्याविषयी बोलायचे झाले तर 2003 मध्ये करिश्मा आणि बिझनेसमॅन संजय कपूर यांनी सप्तपदी घेतल्या होत्या. लग्नाच्या काही दिवसात संजयनं मारहाण केली आणि त्यासोबत तिला खूप त्रास दिल्याचा आरोप करिश्मानं केला होता. त्यानंतर 2016 साली ते दोघे विभक्त झाले. त्यानंतर बऱ्याचवेळा अनेक मुलाखतींमध्ये करिश्मानं त्यांच्या घटस्फोटाची कारण सांगितली आहेत. आता इतकं होऊनही करिश्मा संजयसोबत डिनर डेटवर गेली. हे पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.  

हेही वाचा : Malaika Arora नं आधी शेअर केला प्रियकर अर्जुनचा Nude Photo, आता म्हणतेय ‘हा दुरावाच….’

काही नेटकऱ्यांनी त्या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत करिश्मा कपूरची परिस्थिती समजून घेत तिला पाठिंबा दिला. एक नेटकरी म्हणाला, मुलांना सांभाळाण्यासाठी घटस्फोट घेतल्यानंतर देखील दोघांमध्ये समजुतदारपणा असनं गरजेच आहे, कारण दोन लोकांमध्ये असलेल्या भांडणात मुलांची काही चुक नसते. दुसरा नेटकरी म्हणाला, तिला आयुष्यात खूप आनंद मिळायला हवा अशी मी प्रार्थना करते. तर काही नेटकऱ्यांनी करिश्मा आणि संजय यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, हा खूप चांगला ट्रेन्ड सुरु केला आहे. लग्न करा मग घटस्फोट घ्या आणि मग मित्र व्हा. काय मुर्खपणा आहे हा. दुसरा नेटकरी म्हणाला, हाच होता ज्यानं तिला त्याच्या मित्रांसोबत बेड शेअर करण्यासाठी जबरदस्ती केली होती. तिसरा नेटकरी म्हणाला, घटस्फोटानंतर उरलेले पैसे घेण्यासाठी भेटली असेल. 

करिश्मा आणि संजय यांना दोन मुलं असून समायरा आणि कियान अशी त्यांची नावं आहेत. घटस्फोट झाल्यापासून त्या दोघांना करिश्मा सांभाळते. तर संजय कपूरनं दुसरं लग्न केलं. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *