Headlines

अखेर प्रसाद ओकने दिली जाहीर पार्टी; कधी, कुठे आणि कशाबद्दल?

[ad_1]

Prasad Oak Give Party Maharashtrachi Hasyajatra Team : मराठीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखले जाते. प्रसादने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. धर्मवीर या चित्रपटामुळे तो चर्चेत आला. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. सध्या प्रसाद हा एका वेगळ्या कारणांनी चर्चेत आला आहे. 

प्रसाद ओक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सर्व कलाकार आणि त्यांची संपूर्ण टीम दिसत आहे. यात वनिता खरात, समीर चौघुले, निखिल बने, शिवाली परब, दत्तू मोरे, प्रियदर्शनी इंदलकर, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप, गौरव मोरे हे कलाकार दिसत आहे. त्यासोबतच प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओकही यात पाहायला मिळत आहे. 

प्रसाद ओकची पोस्ट

प्रसाद ओकने या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “ऐका हो ऐका… अखेर #हास्यजत्रा टीम ला पार्टी दिलेली आहे… समस्त रसिकांनी या घटनेची नोंद घ्यावी…!!! मंडळ आभारी आहे…!!!”, असे प्रसाद ओकने म्हटले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

प्रसादच्या या पोस्टवर एकाने समीर चौगुले be like – आज आनंद गगनात मावेना, अशी कमेंट केली आहे. तर एका चाहत्याने गौरव मोरे be like अरे बाबा,आता मरतो की काय? असे म्हटले आहे. तसेच एकाने Every writer of MHJ after this: आता स्किट मध्ये काय बोलून टोमणा मारणार… असे म्हटले आहे. तसेच एकाने प्रसाद सर be like.. च्यायला ह्यांना एकदाची पार्टी देऊनच टाकतो… सारखे माझ्या नावाने बोंब करतायत, अशी कमेंट केली आहे. 

प्रसाद ओक पार्टी देण्याचे कारण काय?

दरम्यान गेल्या वर्षभरापासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात प्रसाद ओक पार्टी देणार यावरुन पंचेस मारण्यात येत होते. अनेक स्किट्समध्ये प्रसादच्या पार्टी देण्यावरुनही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. एका मुलाखतीत प्रसादने हे पार्टी प्रकरण नेमकं काय याबद्दल खुलासा केला होता. 

याविषयी एका मुलाखतीत प्रसाद म्हणाला होता, ”मी हिरकणीनंतर पार्टी देणार होतो. ज्या दिवशी शूटिंग होतं, त्याच्या आदल्या दिवशी रिहर्सलसाठी सर्व एकत्र येतात, त्याच दिवशी पार्टी द्यायची असं मी ठरवले होते. पण नेमकं त्याच वेळी शुटिंग कॅन्सल झालं आणि तेव्हापासून हे लोक माझी मज्जा घेत आहेत. यानंतर चंद्रमुखीच काम सुरु झालं. मग करोना आला. लॉकडाऊन मध्ये कशी पार्टी देणार. पुढे मी दमनला शूट असताना पण पार्टीची व्यवस्था केली. पण चॅनेल हेड म्हणाले तु पार्टी दिली तर एपिसोड मधले पंचेसच संपतील. त्यामुळे लवकर पार्टी देऊच नकोस असं हे पार्टी प्रकरण आहे, असा किस्सा प्रसादने सांगितला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *