Headlines

aditya thackeray replied to uday samant alligation on mva government regarding tata airbus spb 94

[ad_1]

फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता टाटा एअरबसचा मालवाहू विमान बांधणी करणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यावरून राज्यात राजकारण तापले आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर टाटा एअरबसचा एमओयू महाविकास आघाडी सरकार असताना झाला होता, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. दरम्यान, उदय सामंत यांच्या स्पष्टीकरणावर आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा – “त्यांना आता साक्षात्कार झाला आहे” आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन चंद्रकात पाटलांचं टीकास्र; म्हणाले, “मातोश्रीवरुनच…”

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“कदाचित वेदान्त फॉक्सकॉनप्रमाणेच या प्रकल्पचाहीही उद्योग मंत्र्यांना माहिती नसावी. असा एमओयू जर झाला होता, तर काहीही करून एअरबसचा प्रकल्प राज्यात आणू, असे उद्योग मंत्र्यांनी का सांगितले होते? त्यांनी राज्यातील युवकांची फसवणूक का केली? का ते खोटं बोलले? मग इतके महिने ते शांत का होते? याची उत्तरं मिळायला हवी”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

हेही वाचा – ‘टाटा एयरबस’ प्रकल्पावरून होणाऱ्या टीकेला मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “विरोधात असताना…”

उदय सामंत यांनी यापूर्वीही मंत्रीपदावर काम केलं आहे. आज पुन्हा गद्दार सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहे. प्रत्येक मंत्र्याला हे माहिती आहे, की एकदा एखाद्या कंपनीचा संबंधित राज्याशी करार झाला असेल तर तो बदलवता येत नाही. मग तुम्ही कोणत्या आधारावर सांगत होते, की एअर बसचा प्रकल्प महाराष्ट्रात येईल? असा प्रश्नही त्यांनी उदय सामंत यांना विचारला.

हेही वाचा – ‘तुम्ही उद्योजकांकडून टक्केवारी मागायचा’, प्रसाद लाड यांच्या आरोपाबद्दल विचारताच सुभाष देसाई संतापले, म्हणाले “खबरदार, जर…”

“वेदान्त फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज आणि मेडिकल डीव्हाईस प्रकल्पानंतर राज्यात होणारा चौथा मोठा प्रकल्प राज्यातून निघून गेला आहे. हा प्रकल्प मिहानमध्ये होऊ घातला होता. तीन प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यानंतर हा प्रकल्प तरी महाराष्ट्रात व्हावा, अशी इच्छा होती. मात्र, हा प्रकल्पही निघून गेल्याचे दुख: वाटते आहे”, असेही ते म्हणाले.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *