Headlines

अभिनेत्री सई लोकूर झाली आई; पोस्ट शेअर करत दिली माहिती

[ad_1]

मुंबई : कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी आणि मराठीमधील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर बेबी बंप आणि सोनोग्राफीचा फोटो दाखवत गुडन्यूज दिली होती. बिग बॉसमुळे घराघारत पोहचलेली सई लोकूर नुकतीच आई झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. ही पोस्ट शेअर करत सईने लिहीलं आहे की, देवाची सगळी कृपा, one tiny face. आमच्या बाळाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आई आणि बाळ दोघंही ठीक आहेत. सर्व प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद.

याचबरोबर तिने तिच्या सोशल मीडियावर its a girl अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सईला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. अनेकांनी सईच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सुकन्या मोने यांनी कमेंट करत लिहीलं आहे की, Awww….. मनःपूर्वक अभिनंदन आणि छकुली च स्वागत. तर अजून एका चाहतीने लिहीलं आहे की, eartiest congratulations sai lokur and your family for the arrival of the princess A lots of blessings and good wishes to the baby princess and her family. तर अजून बऱ्याच जणांनी अभिनंदन म्हणत तिच्यावर आणि तिच्या कुटूंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिचे चाहते तिच्या बाळाची झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. 

अभिनेत्रीने ‘इत्ति सी हँसी, इत्ति सी खुशी’ या गाण्यावर फोटो आणि व्हिडीओ लावत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यासोबत ती व्हिडीओ शेअर करताना म्हणाली आहे की, प्रेम आणि देवाच्या कृपेमुळे आमचं कुटुंब आता वाढत आहे. त्यांचं जीवन खूप प्रेम, आनंद आणि हास्याने भरुन टाकणारं, त्यांच्यासाठी मौल्यवान असणारं ‘Bundle Of Joy’ लवकरच येणार असल्याने आम्ही आनंदी आहोत.  सईच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्याशिवाय मनोरंजन विश्वातील मित्रमंडळीनेही अभिनेत्रीला भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायम चर्चेत असते. सई आणि तीर्थदीप यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये लग्न केल्यानंतर दोन वर्षांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. सई सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

सईचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. सई नेहमीच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल होवू लागते. आता तिचे चाहते तिच्या लेकीची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *