Headlines

अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव

[ad_1]

Actor Shiv Grewal: मेल्यानंतरचा अनुभव कसा असतो? हे आपण कधी ऐकलं नसेल. पण एका प्रसिद्ध अभिनेत्याने हा अनुभव सर्वांसमोर शेअर केला आहे. जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. निरोगी व्यक्तीला हसताना, खेळताना आणि चालताना हृदयविकाराचा झटका येतो आणि क्षणार्धात मृत्यू होतो. अनेकदा हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी त्याला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे कोणावर कधी ही वेळ येईल याचा अंदाज बांधता येत नाही. त्यातही कोणी मेल्यानंतर जिवंत झाल्याचा दावा करत असेल तर? काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या.

मृत्यूला हात लावून परत येण्याचा काहीसा प्रकार भारतीय-ब्रिटिश वंशाचा अभिनेता शिव ग्रेवालसोबत घडला. अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला पण त्यानंतर जे घडले ते अकल्पनीय आहे. शिवने हा किस्सा सांगितला आहे. 

दहा वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका 

Actor shiv grewal told Experience after death due to Heart Attack

10 वर्षांपूर्वी एके दिवशी मी आपल्या पत्नीसोबत लंडनमध्ये घराजवळ जेवत होता. त्यानंतर मला अचानक हृदयविकाराचा झटका आला. पत्नीने घाईघाईने अॅम्ब्युलन्स बोलावून मला हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे डॉक्टरांच्या पथकाने सीपीआर देऊन मला मृत्यूच्या मुखातून बाहेर काढले. हा सर्व प्रकार सात मिनिटे सुरु होता.या सात मिनिटांत शिवने जे अनुभवले तो अनुभव त्याने शेअर केला आहे. मिररने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

‘माझा आत्मा माझ्या शरीरापासून वेगळा झाला आहे असे मला वाटले’

‘माझा आत्मा माझ्या शरीरापासून वेगळा झाला आहे,’ असे मला असे वाटले. मी स्वत: ला शून्यात, पूर्णपणे वजनहीन जाणवू लागलो होतो. जणू मी पाण्यावर तरंगत आहे, असे वाटू लागले. 

“मग एक वेळ आली जेव्हा मी अंतराळविश्व पाहू शकत होतो. तेथे उल्का होत्या. एवढेच नव्हे तर मी चंद्रावर प्रवास करत असल्याचेही मला जाणवत होते. असे असले तरी मी लवकर माझ्या शरीरात परत जावे आणि माझ्या पत्नीसोबत आयुष्य जगावे, असे मला तेव्हा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटत होते. 

शिवचे हे वक्तव्य सोशल मीडियात खूप चर्चेत आहे. यावर सर्वजण आपल्या प्रतिक्रिया देत आहे. मेलेला माणूस कधी जिवंत होत नाही, हा शिवचा भास आहे, अशी प्रतिक्रिया काहीजण देत आहेत. तर एखाद्याला असा अद्भुत अनुभव येऊ शकतो, असेही काहीजण व्यक्त होत आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *