Headlines

अभिनेता किरण मानेंचा आणि हास्यजत्रेच्या टीमचा तो फोटो होतोय व्हायरल

[ad_1]

मुंबई : बिग बॉस या शोमुळे घरा-घरात पोहचलेला अभिनेता किरण माने कायमच त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. किरण कायमच त्याचं परखड मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. अनेकदा अभिनेता ट्रोलिंगचा शिकारही होतो. किरण अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्यांपैंकी एक आहे. नुकतीच किरण माने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

किरणने एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. यामध्ये किरण यांनी हास्यजत्रेच्या टीमसोबत काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ”…काल नागपूरला जाताना भल्या पहाटेचं फ्लाईट होतं. नेहमीप्रमाणं वेळेवर जाग आलीच नाही. लेट पोहोचलो. बोर्डींग टाईम निघून गेलावता. धावतपळत धापा टाकत विमानात शिरलो. तर विमानातनं वेगवेगळ्या सीटवरनं “ओS मानेS याSSS” अशा हाका ऐकायला यायला लागल्या…दचकून बघितलं तर विमानात ही महाराष्ट्रभर हास्याचा मळा फुलवणारी ही ‘जत्रा’ बसलीवती ! त्यातले बरेच जुने सहकलाकार, मित्र. ओंक्या राऊतबरोबर सहासात वर्षांपूर्वी मी एक नाटक केलंवतं… त्यानंतर थेट आत्ताच भेटला. “सर, तुम्ही त्यावेळी जसे होता, तस्सेच अजूनही आहात.” म्हणत मिठी मारली त्यानं. अरूण कदम दहाबारा वर्षांपूर्वी एका सिरीयलमध्ये माझा मोठा भाऊ झाला होता…” 

किरणने पुढे पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ”तो बी भेटला. प्रभाकर मोरे तर लै लै लै जुना खास मित्र. प्रभ्याला आणि मला किती बोलू किती नको असं झालंवतं. नागपूरला एअरपोर्टमधून बाहेर पडेपर्यन्त आमच्या गप्पा संपत नव्हत्या. प्रसाद खांडेकर पुर्वीपास्नं ‘नाटकवाला’ दोस्त. शिवाली परब हास्यजत्रापासून माहिती झालेली गुणी पोरगी. श्याम राजपूत पयल्यांदाच भेटला. शिवजयंतीची पहाट अशी चेहर्‍यावर हसू फुलवत आली आणि ‘दिल बाग बाग’ करून गेली !लब्यू दोस्तांनो. – किरण माने.”

अनेकांनी किरण मानेच्या या पोस्टवर कमेंट करायला सुरुवात केली आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीत फक्त कलाकार लोकांच्या हास्याचे कारण आहेत,बाकी सगळं ‌‌….. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, कधी तरी आम्हा गरिबांना भेट द्या दादा. तर अजून एकाने लिहीलंय, या कलाकारांचे हास्यजत्रेचे शो बघत असतो… या टीमला खरंच जोड नाही जीवनात हसत राहायचं तर यांचे शो पाहायचं कितीही टेन्शन असु द्या हे गुणी कलाकार हसवणार म्हणजे हसवणारच. तर अजून एकाने लिहीलंय, सर सचिन गोस्वामी सर ही तुमच्या विचारांचे आहेत त्याच आणि तुमचं विचारधारेनुसार छान जमेल …खूप चांगले कार्य ही होऊ शकत माने सर. अशा अनेकप्रकारच्या कमेंट चाहते या पोस्टवर करत आहेत. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *